अखेर भाजी बाजार बस स्थानकावर भरणार,,,, तळोदा एक्सप्रेस इम्पॅक्ट
तळोदा एक्सप्रेस इंम्पॅक्ट अखेर भाजी बाजार बस स्थानकात भरणार
सुनील सुर्यवंशी
तळोदा
तळोदा पालिकेच्या माध्यमातून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानात भाजीपाला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र शहरातील सुज्ञ नागरिकांकडून तळोदा एक्सप्रेस कडे या बाबतीत दाद मागितली या बाबत तळोदा एक्सप्रेस ब्लाँग वरून वास्तव लिखाण करण्यात आले याची दखल तळोदा तहसीलदार क लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी घेतली तसेच तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या संदर्भात लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याशी चर्चा करून बस स्थानक परिसरामध्ये भाजीबाजार करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती
सकाळी तात्काळ मीटिंग -
पालिका प्रशासन व तहसीलदार तळोदा व नगराध्यक्ष अजय परदेशी व पालिकेच्या कर्मचारी यांची नगराध्यक्ष निवासस्थानी तात्काळ बैठक घेऊन भाजीपाला व्यवसायिकांना जवळ बस आगार परिसर उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहे दरम्यान या निर्णयाचे सर्वच स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे बस आगार परिसर हा शहराच्या दृष्टीने सर्वांसाठी तसेच भाजी विक्रेते व ग्राहक यांच्यासाठी सोयीचे ठरणार आहे
याबाबत पालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी तळोदा एक्सप्रेस शी बोलताना सांगितले की तळोदा शहरातील ग्राहकांची गैरसोय व भाजीविक्रेत्यांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्वांना सोयीचे स्थळ म्हणून बस आगार यांची निवड करण्यात आली असून सर्वांनी व अधिकारी वर्गाने निर्देशित केलेल्या आदर्श शिस्तीत सुरक्षित अंतर ठेवून आपले भाजीपाल्याचे दुकान लावण्याच्या संदर्भात घालून दिलेले नियम पाळत सुरक्षितपणे व्यवसाय करावा असे आवाहन करण्यात आले आहे
अजय परदेशी
लोकनियुक्त नगराध्यक्ष तळोदा
तळोदा पालिका प्रशासन कडून निर्णय घेण्यात असला तरी एकंदरीत शहराचा विचार करता मुख्यधिकारी पालिका यांच्याशी चर्च अंती नगराध्यक्ष व आम्ही हा निर्णय लोकहिताच्या दृष्टीने घेतला आहे,
Comments
Post a Comment