व्यापाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने तळोदा शहर दोन दिवस बंद

तळोदा:- नंदुरबार येथे एका जणांचा कोविड 19 चा अहवाल पोसीटीव्ह आल्यानंतर प्रशासनासह जनता ही सज्ज झाली आहे. तालुक्यात सतर्कता म्हणून आवश्यक ते उपाययोजना केले जात आहेत. . 
       शनिवारी सायंकाळी तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या कार्यालायात, नगराध्यक्ष अजय परदेशी, उप पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असणाऱ्या किराणा दुकानदार, फळभाजी विक्रेते यासह इतर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने 2 दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान अत्यावश्य सेवा म्हणून गरजेचे असलेले मेडिकल व दवाखाने व दुध विक्रेते यातून वगळण्यात यावे असे एकमत करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी  लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.  नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार पंकज लोखंडे यांनी यावेळी केले. या बैठकीस शहरातील  व्यापारी, फळ व भाजी विक्रेते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी