ग्रामीण भागाप्रमाणे शालेय पोषण आहार शहरातील विद्यार्थ्यांना ही द्या:- काँग्रेस नगरसेवकांची मागणी
तळोदा:- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शिल्लक असलेला तांदुळ शहरी भागातील जिल्हा परिषद शाळा यातील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा सुधारीत आदेश व संबंधित अधिकारी व शासनास शिफारस करावी अश्या आशयाचे मागणी येथील नगरसेवक गौरव वाणी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांचाकड़े केली आहे.महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भीय आदेशानव्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप होणारा तांदुळ दाळी ,कड़धान्य, कोरोणा विषाणु चा प्रादुर्भाव तसेच साथीचे आजार रोखण्यासाठी घरपोहच वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.
तरी सदर योजना ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांन बरोबरच शहरी भागातील ज़िल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व त्यांचा पालकांना वितरण करण्यात यावे अशे सुधारित आदेश संबंधित अधिकारी व शासनाला शिफारस करण्यात यावी अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे.
निवेदनावर नगरसेवक गौरव वाणी,सुभाष चौधरी,सतिवन पाडवी,बापू कलाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment