सातबारा उतारा शिवाय शेतकरी पीक कर्जापासून वंचित

जवळपास महिनाभरापासून सेतू केंद्रावरील सात-बारा लिंक काम करत नसल्याने शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी लागणारा अत्यावश्‍यक सातबारा मिळविण्यास अडचण येत आहे , तसेच लॉक डाऊन मुळे तलाठी कडूनही सातबारा मिळविणे कठीण झाले आहे, या सर्व कारणांनी शेतकरी चांगलाच कोंडीत सापडला असून सातबारा शिवाय आता बँकांकडून पिक कर्ज मिळवायचे कसे? या चिंतेने शेतकरी राजाला ग्रासले आहे
             नियमित कर्ज परतफेड केल्यानंतर नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी बँकांमध्ये नवीन अद्यावत सातबारा उतारा व इतर कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु जवळपास महिनाभरापासून लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच सेतू केंद्रांवरील सातबारा लिंक काम करत नसल्याने सातबारा उतारे निघत नाहीत. त्याचप्रमाणे लॉकडाउन मुळे तलाठी देखील आपल्या सजेवर उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्गाला सातबारा उतारा साठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे या सर्वांमुळे शेतकरी वर्ग चांगलेच कोंडीत सापडला असून सातबारा शिवाय आता पिक कर्ज मिळवायचे कसे या विचाराने चिंतातुर झालेला आहे.
            गेल्या मोसमात अवकाळी  पावसाने धुमाकूळ घालत अतिवृष्टी आणि अवकाळी कातळात अख्खा खरीप हंगाम उद्ध्वस्त केल्या रब्बीतही अवकाळी शेतकऱ्यांना सळो कि पळो करून सोडले होते त्यामुळे दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनली रब्बी तील काही पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी झाले परंतु अचानक उद्भवलेल्या जागतिक कोरोना महासंकटामुळे सध्या सर्वत्र लोक डाऊन करण्यात आलेले असून आलेले उत्पादन विक्री करण्याची मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत अर्थार्जनाचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकाची पेरणी करायचे असल्यास ते कर्जाशिवाय पर्याय उरलेला नाही. परंतु कर्ज मिळवण्यासाठी शेतीचा सातबारा आवश्यक असून जवळपास महिनाभरापासून सेतू केंद्रांवरील सातबारा लिंक काम करीत नसल्यामुळे तसेच लोक डाऊन मुळे सध्या सर्वत्र सायबर कॅफे देखील बंद आहेत. सेतू केंद्र बंद आहेत. नागरिकांना घराबाहेर निघनेवर  बंदी आहे ,अशा परिस्थितीत शेतकरी बाहेर निघाला तरी तलाठी कार्यालयात अथवा चावडीवर तलाठी उपलब्ध नसल्याने शेतीच्या अद्यावत सातबारा उतारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा दुहेरी अडचणीत सापडला असून सेतू लिंक तात्काळ सुरळीत करण्याची किंवा सातबारा उतार याशिवाय कर्ज देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

*शेतकऱ्यांची व्यथा*
*नियमित कर्जपरत फेड करून देखील लाभ नाही*
                     विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून आर्थिक व्यवहारावर त्यामुळे मोठा परिणाम झाला आहे असे असतानाही अनेक नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्ज परत फेड केली आहे परंतु सातबारा मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

*बँकांची भूमिका*
शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर ते नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र होतात मात्र नवीन कर्ज देताना बँकांना नियमानुसार चालू तारखेच्या सातबारा उतारा व खाते उतारा द्यावा लागत असतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या नावावर सदरील शेती असून शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकाची सातबारा उतारा वरील पीकपेरा बाबत  नोंदीनुसार पडताळणी करून त्या प्रमाणात पीक कर्ज देणे सोयीचे होते तसेच शेतकऱ्यांना कर्ज देताना शेती बँकेला तारण ठेवलेली असते त्याबाबत सातबारा उताऱ्यावर बँकेच्या कर्ज बाबत असलेल्या बोजाची नोंद  असल्याचे देखील खात्री करावी लागत असते त्यामुळे नियमानुसार सातबारा उतारा मिळाल्यावरच नवीन पीक कर्ज वितरण करता येत असते त्याचप्रमाणे त्यांच्या नियमानुसार इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यात येत असते सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या व्यवहाराच्या जणू आरसाच असतो त्यामुळे नियमानुसार सातबारा उतारा शिवाय पीक कर्ज अदा करता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी