छुपे मार्गावर पोलीस नेमण्याची मागणी

तळोदा:- तालुका हा गुजरातराज्याच्या सीमा लगत असल्याने शेजारील असलेल्या दोघे राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही राज्यात दळन -वळण करण्यासाठी अनेक छुपे मार्ग आहेत. तसेच रात्री बेरात्री दुचाकीस्वार आणि पायी येणाऱ्यांची संख्या या दोन राज्यांना जोडणाऱ्या मार्गाने आहे. तालुक्याच्या ग्रामपंचायतीन्नी स्वयंसेवकांची निवड केली आहे. दरम्यान गावात बाहेरून येणाऱ्याना देखील परवानगी नाकारली जात आहे. मात्र अनेकजण आजही छुप्या मार्गाने गावात दाखल होत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून छुपे मार्ग पूर्णत बंद करावे यासाठी काही महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करावेत अशी अपेक्षा व मागणी प.स सभापती यशवंत ठाकरे व उपसभापती लताबाई वळवी यांचे पती अर्जुन वळवी यांनी केली आहे.
           खापरच्या सीमारेषेवरील गुजरातच्या डेडियापाडा तालुक्यात सेलांबा येथील एक व नर्मदा तालुक्यातील 3 जन कोरोनाबाधीत  असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच शेजारील मध्यप्रदेश सिमेलगत असलेला सेंधवा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. गावागावत ग्रामदक्षता समिती गठीत झाले आहेत. मात्र आजही अनेक जण छुप्या मार्गाने गावात व शहरात दाखल होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस केवळ चौकात थांबून वाहनावर कारवाई करत आहे. मात्र ग्रामीण भागातील छुपे मार्ग बंद करण्याची आवश्यकता असल्याचे मत समापती ठाकरे यांनी पुण्यनगरीशी बोलताना व्यक्त केले.
          मध्यप्रदेशलगत असलेले महाराष्ट्रातील ब्रह्मणपुरी मंदाणे, भोरटेक्, जावदा, टाकळी, नवानगर, जाम, शहाणे, या भागातून मध्यप्रदेश कड़े ये जा करण्याचे  लहान मोठे रस्ते आहेत. या मार्गाने वाहतुक सह दुचाकीस्वार याच रस्त्याने दुचाकी वाहतूक व काही लोक पायी सीमा पार करताना दिसत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
          त्याच बरोबर शेजारी सिमेलगत  गुजरात व मध्यप्रदेश राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सीमा सुरक्षित असणे आवश्यक आहे. गुजरात राज्याच्या सिमेला लागून तळोदा तालुका असल्याने याचे अंतर जास्त लांब नसल्याने अनेक जण महाराष्ट् राज्यातून गुजरात राज्यात जाण्यासाठी छुप्या मार्गाचा वापर करत असल्याचे चित्र आहे. छुपे मार्ग जात असलेल्या गावांच्या सीमा पूर्णपणे बंद केल्यास बाहेर गावाहून  येणारे व जाणारे यांच्यावर पूर्णपणे लगाम लागेल.

असे आहेत गुजरात व मध्यप्रदेश ये जा करण्यासाठी छुपे मार्ग
         गुजरात हद्द लगत असलेले महाराष्ट्रतील गावे इच्छागव्हान, अलिविहिर पिंपरपाडा चौकी, मौलिपाड़ा, एकढल, वाल्हेरी, सालदारनगर, अमोनी, रेवनागर, चौगाव, गड़ीकोठला,अक्कलकुवा ह्या मार्गाचा वापर गुजरात महाराष्ट्रसाठी होत असून ह्या मार्गाने छुपी वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे.  

*हे आहेत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रला जोडले जाणारे छुपे मार्ग* 
         आणि सध्या ह्याच मार्गाचा वापर होतंना दिसून येत आहे.धड़गाव ते शहादा रस्ता, कोठार चौफुली, वरपाड़ा,पाडळपुर ,राणीपुर चौफूली, धनपुर न्यूबन, जीवानी, मालदा, तुळाजा, नवागाव भूते आकाशपुर,ह्या मार्गाचा सध्या वापर होतांना दिसून येत असल्याने याचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा अशी मागणी जोरधरु लागली आहे...

*प्रतिक्रिया***
       गुजरात व मध्यप्रदेश राज्याचा सीमा ह्या अक्कलकुवा तळोदा व शहादा तालुक्याला लागून आहेत. मात्र या भागातून अनेक छुपे रस्ते आहेत. ज्यांच्या वापर करून अनेकजण पायी किंवा दुचाकीच्या साहाय्याने आजही छुपा प्रवास सुरूच आहे. नंदुरबार जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी छोटे मोठ्या रस्त्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवणे आवश्यक झाले आहे. ग्राम सुरक्षादल बाहेरगावाहून येणाऱ्यावर निर्बंध घालण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत  आहे. मात्र त्यांचा सोबत पोलीस दलातील एक दोन कर्मचारी दिल्यास अंमलबजावणी आणखी प्रभावी करण्यास मदत होणार आहे. 

यशवंत ठाकरे  
सभापती तळोदा पंचायत समिती

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी