त्या चार जणांचा नेगेटिव्ह अहवालाने तात्पुरते संकट तळले असले तरी
तळोदा:- अक्कलकुवा येथील महिलेच्या व तिच्या पतीच्या प्राथमिक सपर्कात आलेल्या चारही व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले असल्याने तळोदेकर व प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात अधिक सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या असून पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अक्कलकुवा येथे निवास असणारे शिक्षक दांपत्य तळोदा शहरातील एका जी,प, शाळेत असून लॉक डाऊन काळात शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचे आदेशा नंतर मालेगांव येथून 17 एप्रिल रोजी तळोदा येथे शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटपसाठी तलोद्यात पती शिक्षक उपस्थित होते, त्याच्या हस्ते 87 विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते.
21 रोजी कोरोनाच्या लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त होताच मध्यरात्रीच तहसीलदार पंकज लोखंडे, सहाय्यक आरोग्य जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी बैठक घेऊन त्या शिक्षकांच्या प्राथमिक सपर्कात आलेल्या 1 शिक्षक व 3 मदतीनीस महिला असे एकुन 4 जणांचे स्वब 22 एप्रिल रोजी धुळे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्यांना खबरदारी म्हणुन त्यांना आमलाड येथे विलगिकरण कक्षात दाखल केले आहे. यासोबतच शालेय पोषण आहार घेणाऱ्या 87 कुटुंबातील 376 जनांचे आरोग्य तपासणी करून त्यांना होम कॉरनटाईन केले आहे. तर 4 जणांचा अहवालाबाबत शहरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर अहवाल निगेटिव्ह यावा याकरिता अनेकांने देव पाण्यात ठेवले होते. तर सदर अहवाल बाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. आज 25 रोजी सकाळी अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याचे आरोग्य विभागा कडून सांगण्यात आल्याने प्रशासनाने व शहर वासीयांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना हा तळोदा व शहाद्यात दाखल झाला आहे. बेफिकीर न बाळगता सतर्क व जागरूक होण्याची गरज आहे...
अक्कलकुवा येथील कोरोना झालेली व्यक्तीचे तळोदा संपर्कामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली. १७ तारखेला ती महिला शिक्षिका व तिचे पती हे तळोदा शहरात दाखल झाले होते. मालेगाव हे कोरोणाचे हॉटस्पॉट ठरले असतांना त्या महिलेचा रिपोर्ट येईपर्यंत तळोदा तालूका प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ होते. यावरून ती महिला सहज तळोद्यात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्या महिलेला जर तळोदा शहरांत दाखल होण्यापासून रोखले असते तर तळोदा शहरातील नागरिक धोक्याच्या खाईत ढकले गेल्यापासून वाचले असते व प्रशासनाची धावपळ देखील झाली नसती. त्या महिला शिक्षिका व तिच्या पतीच्या संपर्कात आलेल्या सर्वं व्यक्तींचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले आल्यानंतर शहर वाशीयांसह प्रशासनाच्या जीव जरी भांड्यात पडला असला तरी येत्या काळात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याची आवश्यकता आहे.
तळोदा शहराच्या शेजारील तीनही तालुक्यात कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत.त्या शहरांतून किंवा इतर कोणत्याही शहरांतून चोरी-छुप्या व उपडपणे तळोदा शहरांत दाखल होणार नाही, याबाबत प्रशासनाने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. तळोदा शहराच्या सीमा तात्काळ सील करण्याची गरज असून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीबद्दल ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. सद्यस्थीतीत तळोदा शहरात कोणीही कुठुणही येत असल्याचे चित्र असून सजक नागरिक पुढाकार घेऊन प्रसांगी शिवीगाळ सहन करून बाहेरून येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला देत आहेत. तळोदा शहरात कोरोणा लागण झालेली महिला येऊन बिनदिक्कतपणे वावरून गेली ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. आता तरी तळोदा शहराच्या सीमा कागदावर सील न करता प्रत्यक्षात दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाने गांभीर्य दाखवावे, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येऊ लागली आहे...

Comments
Post a Comment