तलोद्यात पारा वाढल्याने रस्ते निर्मनुष्य
सुनील सुर्यवंशी
तळोदा
संपूर्ण देश लॉक डाऊन असताना तळोदा शहर देखील त्याला अपवाद नाही मात्र लॉकडाऊन दरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारहाट करण्यासाठी येतात , तर मात्र काही तरुण कारण नसतांना रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तळोदा पोलिसांनी मागील आठ दिवसापासून दुचाकीवर कार्यवाही सुरू केली असून दररोज कार्यवाही होत असली तरी दुचाकी स्वार दिसतच आहेत ,
मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून निसर्गाने आपली संचारबंदी सुरू केली असून दुपारी बारा वाजे नंतर तप्त उन्हाच्या झळा सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत जात असल्याने सर्वच रस्ते निर्मनुष्य होताना दिसतात शहरात भाजीबाजारात सकाळी बऱ्यापैकी वर्दळ दिसते मात्र बारा वाजे नंतर सर्वत्र सामसूम दिसून येत असून प्रशासनाने संपूर्ण दिवस लॉक डाऊन केला असला तरी नागरिक रस्त्यावर येत होते आता मात्र दुपारी सूर्य आग ओकताना दिसत आहे त्यामुळं शहादा रोड बस स्थानक परिसर स्मारक चौक तहसील कचेरी रोड हातोडा रोड प्रमुख बाजारपेठेत सर्वत्र दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे
Comments
Post a Comment