शिक्षकांचे ऑनलाईन मार्गदर्शन
सुनील सुर्यवंशी
तळोदा प्रतिनिधी महाराष्ट्रात लाॅक डाऊन असल्याने शाळा महाविद्यालयांना सूटी आहे याचा सदुपयोग करत नंदूरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाने संघटनेचे राज्य पदाधिकारींशी संपर्क करून जिल्ह्य़ातील मूख्याध्यापक संघाच्या पदाधिकारींसाठी दररोज दोन तास आॅन लाईन कार्यशाळा सुरू केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लाॅक डाऊन जाहीर केले आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक घरी आहेत. वेळेचा सदुपयोग करीत नंदूरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी संघटनेचे राज्य पदाधिकारींशी संपर्क करून जिल्ह्य़ातील मूख्याध्यापक संघाच्या पदाधिकारींसाठी दररोज दोन तास आॅन लाईन कार्यशाळा सुरू केली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, व शंका समाधान केले जात आहे. या दररोजच्या आॅन लाईन कार्यशाळेत जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील यांनी रजा व रजानियम, सेवा पुस्तक, गोपनीय अहवाल, ग्रेच्युटी व पेंशन योजना यावर मार्गदर्शन केले. पुणे मूख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपूले यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ व मूख्याध्यापकाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ आर डी निकम यांनी अंशदान पेंशन योजना (डीसीपीएस) व मूख्याध्यापकाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तानाजी माने यांनी बिंदूनामावली व त्यातील आतापर्यंत झालेले बदल यांवर मार्गदर्शन केले. यासोबतच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी ही मार्गदर्शन करीत आहेत यांत दिनेश साळुंखे सेवाशर्ती नियमावली 1981,रविंद्र वाघ सेवाज्येष्ठता यादी व विगतवारी, कुंदन पाटील कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, सूनिल भामरे मानव विकास मिशन योजना, निमेश सूर्यवंशी शालेय अभिलेख व मूख्याध्यापक नियोजन, अजित टवाळे वेतनेतर अनुदान निर्धारण व खर्च, दत्तात्रय सूर्यवंशी शालेय व्यवस्थापनात मूख्याध्यापकाची भूमिका. या विषयावर दि 30 मार्च पासुन दररोज आॅन लाईन कार्यशाळा सुरू आहे. या साठी नंदूरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पूष्पेंन्द्र रघुवंशी, कोषाध्यक्ष दिनेश साळुंखे, कौन्सीलर सूनिल परदेशी हे परीश्रम घेत आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
Comments
Post a Comment