Posts

Showing posts from May, 2026

अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
प्रतिनिधी तळोदा:- (किरण पाटील) अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त  रक्तदान शिबिर उत्साह  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबार व जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्रात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. शामकांत पाथवड यांच्या हस्ते करण्यात आले. ईद निमित्ताने प्राण्याची कुर्बाणी देण्याच्या रूढी टाळून त्या ऐवजी स्वतःचे रक्ताचे दान करून सामाजिक संदेश देत देण्यासाठी अनिसकडून दरवर्षी हा सामाजिक उपक्रम जातो.या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी २७ मे ते २ जून या कालावधीत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे बकरी ईद निमित्ताने “रक्तदान सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्त संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. धार्मिक सण अधिक समाजाभिमुख व मानवतावादी पद्धतीने साजरे व्हावेत, या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येन...

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी श्री सुधाकर मराठे यांची निवड

Image
प्रतिनिधी तळोदा:-- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची निवड  तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७ मे २०२६ रोजी तळोदा येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                   सन २०२६-२७ करिता तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तळोदा येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक भरत भामरे, ईश्वर मराठे, दत्तात्रय सुर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सुधाकर मराठे, सम्राट महाजन, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दिपक मराठे, नारायण जाधव, महेंद्र सूर्यवंशी, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी उपस्थित होते.           ...

उभ्या गाडीचा टायर फुटल्याने चालकाचा जागीच मृत्यू

Image
प्रतिनिधी तळोदा:--  तळोदा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी सुमारे ९:४५ वाजण्याच्या सुमारास तळोदा बायपास परिसरात ट्रकच्या टायरचा स्फोट होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला . मिळालेल्या माहितीनुसार, सानेश्वर दिलीप मिस्तरी (वय ३७, रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गुजरातमधील नशिराबाद येथून सिमेंटच्या गोण्या भरून तळोदा येथे आले होते. घटनेच्या वेळी ते ट्रक क्रमांक MH १८ BG२८७४ च्या टायरमध्ये हवा तपासत होते. त्याच वेळी अचानक टायरचा जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटाचा आवाज प्रचंड होता आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्राथमिक तपासात टायरमधील जास्त दाबामुळे हा स्फोट झाल्याचे समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कष्टकरी चालकाचा अशा अचानक अपघातात मृ...