अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी तळोदा:- (किरण पाटील)
अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त
रक्तदान शिबिर उत्साह
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबार व जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्रात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. शामकांत पाथवड यांच्या हस्ते करण्यात आले. ईद निमित्ताने प्राण्याची कुर्बाणी देण्याच्या रूढी टाळून त्या ऐवजी स्वतःचे रक्ताचे दान करून सामाजिक संदेश देत देण्यासाठी अनिसकडून दरवर्षी हा सामाजिक उपक्रम जातो.या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी २७ मे ते २ जून या कालावधीत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे बकरी ईद निमित्ताने “रक्तदान सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्त संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. धार्मिक सण अधिक समाजाभिमुख व मानवतावादी पद्धतीने साजरे व्हावेत, या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन महा.अनिसच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरात महा.अनिसचे शाखा कार्याध्यक्ष सूर्यकांत आगळे, शाखा प्रधान सचिव बलदेव वसईकर, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी, राज्य कार्यवाह किर्तीवर्धन तायडे, पंकज विनोद पाडवी, निरज जावरे, राजा पवार, राजेंद्र पिंपळे, राजू चौधरी, भिकन भटू भोये, दिपकभाऊ चौधरी आदींनी रक्तदान केले. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्त संकलन अधिकारी डाॅ. रमा वाडीकर, डाॅ. शामकांत पाथवड, तंत्रज्ञ प्रितम मेन्थेवाड, समुपदेशक विश्वनाथ वळवी व समुपदेशक श्रीमती किरण मेंढे यांनी सहकार्य केले. दरम्यान, थॅलेसेमिया जिल्हा समन्वयक रणजीत राजपूत यांनी थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली.
Comments
Post a Comment