तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी श्री सुधाकर मराठे यांची निवड
प्रतिनिधी तळोदा:--
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची निवड
तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७ मे २०२६ रोजी तळोदा येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सन २०२६-२७ करिता तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तळोदा येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक भरत भामरे, ईश्वर मराठे, दत्तात्रय सुर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सुधाकर मराठे, सम्राट महाजन, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दिपक मराठे, नारायण जाधव, महेंद्र सूर्यवंशी, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मावळत्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. बैठकीत मागील हिशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघाच्या पुढील कार्याचे नियोजन करून अधिक जोमाने काम करण्याचे ठरले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, महिला दिनानिमित्त महिलांचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकारांचा सन्मान तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजपयोगी कार्यात तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे. पत्रकार संघाची निवडीनंतर विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
चौकट
आपण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.हा विश्वास माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे.
मी माझ्यासह संघटनेचे उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने पत्रकार संघाच्या हितासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा प्रयत्न करीन.
तळोदा ता मराठी पत्रकार संघ
अध्यक्ष
श्री सुधाकर मराठे
Comments
Post a Comment