प्रतिनिधी तळोदा:--
   (किरण पाटील)
तळोद्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी   अभिवादन 
मान्यवरांनी जागवल्या आठवणी! ; बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

तळोदा : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तळोदा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

        या कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांच्या अंगरक्षक म्हणून काम केले असून त्यांचे व्यक्तिमत्व जवळून अनुभवायला मिळाले, त्यांच्या विचारांत व व्यक्तिमत्त्वांमध्ये वेगळे तेज होते,असे ते म्हणाले. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मुंबईसह महाराष्ट्रावर शिवसेनेच्या दरारा, बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, सत्ताधाऱ्यांकडून लोकांची कामे करून घेण्याची पद्धत,त्यांचे विचार आणि नेतृत्व याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. 

    शिवसेना तालुकाप्रमुख अनुप उदासी तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय राणा यांनीही बाळासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश चौधरी, नगरसेवक अजय परदेशी, उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, कल्पेश चौधरी, डॉ. शैलेश पटेल, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, बब्बू माळी, नदीम बागवान, संदीप परदेशी, सूरज माळी, हंसराज महाले,आनंद सोनार, देवेंद्र कलाल, संजय पटेल, गौरव वाणी, निसार मक्रानी, बापू कलाल,विपुल कुलकर्णी, गौतम जैन, बळीराम पाडवी,भूषण सोनार, प्रभाकर मगरे जालंधर भोई.यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

कानुबाई मातेच्या आगमनाने माहेरघरात उत्साह;परिवाराच्या एकत्रीकरणाचा अनोखा सोहळा

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री.बडादादा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप