तळोदा पोलिस प्रशासनाने चोरीचा तपास गतिमान करण्यासोबतच राजकिय दबावाला बळी न पडण्याची गरज

कालीचरण सूर्यवंशी
       तळोदा शहरात दिवसा ढवळ्या एक शिक्षकाचा घरी घरफोडी झाल्याने शहरातील नवीन  वसाहती मध्ये भीतीचे सावट पसरले असून पोलिसांचं भयच आता चोरांना राहिले नाही की काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
      तळोदा शहरात नवीन वसाहत परिसरात दरवर्षी घरफोडी होत असते त्या चोरीचा तपासात किती गुन्हाच छडा लागतो किती मुद्देमाल सापडतो हा निश्चितच शोधाचा विषय आहे.


       तळोदा  तालुका पोलिस स्टेशन मध्ये खूप दिवसांनी पूर्ण वेळ पोलीस निरीक्षक लाभला असून त्यांचे स्वागत जरी दिवसा ढवळ्या  झालेल्या धाडसी चोरीने आज्ञात  चोरट्यांनी केले असले तरी  पहिल्याच दिवशी रुजू झाल्या नंतर मुख्य रस्त्यावरील दुचाकी वर कार्यवाही करत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला . तसेच शाळा महविद्यालयात  भेटी देवून समस्या जाऊन घेत थेट संपर्क व थेट कार्यवाही होवु शकते याचा नमुना दाखवला असला तरी नुसते आरंभ म्हणून कार्यवाही नको तर त्यात सात्यत असल्याशिवाय शिस्त लागणार नाही .

राजकीय दबावाला झुगारून शहरात कडक शिस्त लावावी -
तळोदा शहरात कायदा काही ठराविक सर्व सामान्य लोकांना न दाखविता सर्वच  जण साठी सारखा राबविला पाहिजे.मागील अनुभव पाहता अनेकदा गंभीर गुन्हा घडून देखील  त्याचा बाबत कठोर कलम न लावता किरकोळ कलम लावून गुन्हा नोंद असल्याचे बोलले जाते.
       साधी तीन सीट बसणारे तरुणावर कार्यवाही करण्यासाठी दुचाकी ताब्यात घेतली तरी तळोदा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी खणानतात . त्यामुळं गुन्हा छोटा असो की मोठा तळोदा शहरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा राजकीय दबाव लादला जातो . त्यामुळं पोलिसांची  मानसिकतेवर परिणाम होवून आत्मविश्वास कमी होतो .त्यात प्रत्यक्ष ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तो नेत्याचा रुबाबावर पोलीस कर्मचारी जवळ अरेरावी करत असतात.  यात बदल होणे  नवीन अधिकारी राहुल पवार यांचा कडून अपेक्षा असून  राजकीय हस्तक्षेप  थांबविण्यासाठी त्यांनी सर्वानाच पोलिसी खाक्या दाखवून कायदा काय असतो हे दाखवून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


     तळोदा शहरात अवैध व्यवसाय फोफावले असून बनावट मद्यविक्री .गांजाविक्री. सोबतच शेजारील राज्यातून अवैध रित्या गावठी कट्टा देखील तळोदा शहरात अनेक जण बाळगून असल्याचे गोपनीय वृत्त आहे.अवैध प्रवासी वाहतूक  सोंबतच अनेकांचा दुचाकीवर वाहन क्रमांकच नाही . त्यांच्यावर कार्यवाही मध्ये सात्यत असणे आवश्यक आहे.
        मिसरडी देखील न फुटलेले मूले खुलेआम दुचाकीवर  अत्यंत वेगाने रस्त्यावर धावतात . त्यांचा कडे वाहन परवाना देखील नसतो .मात्र या बाबत वाहतूक शाखा कडून नवीन नियुक्त अधिकाऱ्यांनी कडक कार्यवाही करून घेणे अपेक्षित आहे.

रात्री १० चा नियम सर्वांना सारखा असावा -
    रात्री दहा वाजता सर्व आस्थापना बंद झाल्या पाहिजे असा आदेशच असल्याने पोलीस प्रशासन अत्यंत योग्यरीत्या राबवित आहेत .मात्र असे करत असताना काही ठिकाणी अवैध रित्या व्यवसाय सुरू असतात तर काही ठिकाणी परवाना धारक मद्यविक्री आस्थापना शटर चा खालून विक्री करतात.
तर रात्री पत्ते क्लब सुरू असतात.

 धूम स्टाईल कधी बंद होईल  - 
              तळोदा शहादा रस्त्यावर रात्री जेष्ठ नागरिक महिला  व तरुणी फिरण्यासाठी  कुटुंब सोबत येत असतात या भागात मात्र याच वेळी मुद्दाम दुचाकीवर येवून सायलेन्सर काढलेले वाहन अतिशय वेगाने फिरविले जातात या बाबत कोणतीही ठोस व कठोर कार्यवाही अजून पावेतो झालेली दिसून येत नाही.
तळोदा शहरात महाविद्यालय परिसरात शाळा सुटताना भरताना जाणीवपूर्वक काही तरुण बुलेट चा फटाक्यांचा आवाज कानथळ्या बसवितो त्यावर  कठोर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. 

किरकोळ गुन्हाची नोंद करण्यास टाळाटाळ -
      शहरात मोबाईल चोरी. दुचाकी चोरी अश्या विषयात गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचारी चालढकल  अनेकदा केली जाते.  या बाबत देखील येणाऱ्या  तक्रार दात्याला समाधानारक उत्तर मिळून गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.

गंभीर गुन्हाच तपास वेगाने होणे अपेक्षित -
        तळोदा शहरात व तालुक्यात मागील काळात अनेक गंभीर गुन्हे घडले असून त्याची नोंद होते मात्र तपास अतिशय  संथ गतीने होतो . अनेक गंभीर घरफोड्या बाबत पुढे काय झाले अजूनही तपास लागलेला नाही.भर वस्तीत पेट्रोल पंप चालकाला कट्टा दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत गुन्हेगार मध्ये वाढली असून पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी पोलिसांचा धसका घ्यावा अशी मागणी होत आहे.

सी.सी.टीव्ही.आवश्यक - तळोदा शहरात मागील काळात पोलीस प्रशासन कडून सी.सी.टीव्ही.बसविण्यात आले होते. मात्र कालांतराने ते बंद पडले असून शहरातील मुख्य ठिकाणी सी.सी.टीव्ही बसविणे काळाची गरज झाली आहे या बाबत व्यापारी संघटना शी  या बाबत चर्चा झाली असली तरी त्या साठी अधिक निधीची अजूनही आवश्यकता आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी