सूर्यवंशी नगरातील गटार, रस्ता व पथदिव्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी तळोदा :-- (किरण पाटील)
सूर्यवंशी नगरातील गटार, रस्ता व पथदिव्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
सूर्यवंशी नगर परिसरातील गटार, रस्ता, पथदिवे व इतर मूलभूत नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत नगराध्यक्ष सौ. भाग्यश्रीताई चौधरी यांची भेट घेऊन नागरिकांनी समस्या मांडल्या. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मुख्याधिकारी श्री.जगदाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने पुन्हा निवेदन देण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांनीही कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनावर सूर्यवंशी नगर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
. विजयराव सोनवणे, अनुराग सेक्शन, कृष्णा वाघमारे, मैकु सक्सेना, गणेश शिंपी, आबा जोशी, श्रावण सक्सेना, अक्षय किल्लेदार, विजय कसबे, दिनेश शिंपी, पिंटू शिंदे, हिमांशू शिरसाट.
---------------0000------------0000--------------
सर्व्यांवर नजर समान
तळोदा एक्सप्रेस
मुख्य संपादक
किरण पाटील
मो 9850244331
Comments
Post a Comment