नगराध्यक्षांच्या तत्परतेने वाचवले कर्मचाऱ्यांचे प्राण

प्रतिनिधी तळोदा :--

तळोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची माणुसकी आणि प्रशासनाची सतर्कता अपघातात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे वाचवले प्राण

 तळोदा नगर परिषद कार्यालयात नेहमी प्रमाणे आपले कर्तव्य बजावत असताना कर्मचारी श्री. छोटू झिपा चौधरी हे पालीकेचा कामासाठी पालीकेचा जिना खाली उतरत असतांना त्यांच्या अचानक  तोल जाऊन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. 
सदर ही घटना घडताच नगरपरिषदेत असलेल्या नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री योगेश चौधरी यांना कळताच त्यांनी तात्काळ अत्यंत आपुलकी व संवेदनशीलतेचा परिचय देत, ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता क्षणाचाही विलंब न करता ते स्वतः कर्मचारी शुभम चौधरी यांच्या वाहनात बसून ते जखमी कर्मचाऱ्याला सोबत बसवून तळोदा येथील मंगलश्याम हॉस्पिटल येथे दाखल करुन माणूकीचे दर्शन घडविले. 
सदर याबाबतीत नगराध्यक्षांच्या या समयसूचकतेमुळे पालीकेचा जखमी कर्मचाऱ्यावर तात्काळ वेळेत उपचार सुरू होऊन त्यांचे प्राण वाचले.
सदर या घटनेचे गांभीर्य ओळखून नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. कमलेश काळे यांच्यासह शुभम चौधरी, अश्विन परदेशी, जगदीश सागर, दिगंबर माळी, भटू चौधरी व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ मंगलश्याम हॉस्पिटल गाठले व मदतीसाठी उभे राहिले. रुग्णालयात उपचाराची व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी आणि कर्मचाऱ्याला सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कता दाखवून तात्काळ सहकार्य केले.
सदर या घटनेमुळे नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व कर्मचारी यांनी दाखविलेली तत्परतेमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कानुबाई मातेच्या आगमनाने माहेरघरात उत्साह;परिवाराच्या एकत्रीकरणाचा अनोखा सोहळा

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री.बडादादा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप