कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी जुनी पेन्शन संघटनेकडून एक दिवसाच्या पगार मुख्यमंत्री सहायता निधीत

तळोदा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने कोराणाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी स्वेच्छेने एक दिवसाच्या पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

        संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत असताना या जागतिक संकटाने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे. या महाभयंकर आजारामुळे महाराष्ट्र लॉकडाऊन झालेला आहे. अशा वेळी महाराष्ट्रात हातावर कमवणारे अनेक आहेत.त्यांचे पोट रोजंदारीवर आहे.अशा सामान्य वर्गाला रोजच्या अनेक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.या सर्व समस्यांची एक कुटुंब प्रमुख म्हणून शासनाने मार्ग काढलाच पण सोबतच महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून आमचे ही काही उत्तरदायित्व आहे. या भूमिकेतून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेले सर्व कर्मचारी एक दिवसाच्या पगार स्वेच्छेने या कोरणासारख्या युद्धाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यास तयार असून पुढिल महिन्याच्या पगारातून आमचा एक दिवसाचा पगार या आपत्तीसाठी घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

           सोबतच महाराष्ट्रातील सर्व युवा कर्मचाऱ्यांना या निवेदनाद्वारे मोठ्या प्रमाणात रक्त दान करण्याचे आवाहन सुद्धा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार कोरोना ह्या आपत्तीवर मात करून महाराष्ट्र पुन्हा सुजलाम-सुफलाम व विकास देशात प्रथम क्रमांकावर कायम राहील असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, संघटनेचे राज्यात दोन लाख नोंदणीकृत सदस्य असून शासनाला संघटनेच्या या निर्णयामुळे मोठी मदत होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील संघटनेचे सुमारे बाराशे सदस्य असून सर्व जण आपला एक दिवसाचा पागर देणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी दिली आहे.

       पत्रावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर राज्य सचिव गोविंद उगले यांच्या सह्या आहेत.

               

    

         

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी