तळोदा परिसरात खाजगी दवाखाने बंद, कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांचा पोबारा

नेहमी टीकेचे धनी ठरणारे आरोग्य विभाग ठरतय देवदूत

तळोदा:- नेहमी टीकेचे धनी ठरलेले तळोदा उपजिल्हा रुग्णालय हेच आता अहोरात्र रुग्णसेवेत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी घराबाहेर न पडण्याचा सूचना असतानाही डॉक्टर मंडळी सेवेसाठी सतर्क आहेत. रात्रंदिवस धावपळ करत 24 तास सेवा पुरवीत आहेत. कठीण परिस्थितीत आम्ही काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.    
                    कोरोनाच्या भीतीपोटी एकीकडे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी बंद पुकारल्यानंतर येथे जाणारे रुग्ण सरकारी दवाखाण्याकडे धाव घेत आहेत. परिणामी तुटपुंज्या मनुष्यबळ असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. संसर्गजन्य भागातून शहरात 200 पेक्षा अधिक जण दाखल झालेले आहेत. त्यांना होम कोरोटाईन केले आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व प्रशासनाची आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पूर्व नियोजन म्हणून आमलाड येथे 200 खाटांचे विलगीकरणं कक्ष साकारले असून या कक्षाची प्रमुख जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्याकडे आहे.
यासह उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विजय पाटील, डॉ. कैलास ठाकरे, डॉ.अनिल पावरा, डॉ.आपसिंग पाडवी यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या प्रयत्न करत आहे. 
              अश्या आवश्यक काळात खाजगी डॉक्टरांनी बंद पुकारल्यामुळे  मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार यासारखे गंभीर आजार असलेले व थंडी, ताप,सर्दी, खोकला आजार असलेल्या रूग्णांची अवस्था रामभरोसे आहे. परिणामी शहर वाशियाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र खाजगी दवाखाने बंद असल्याने इतर समस्यां प्रशासना समोर निर्माण होत आहेत.  
                 आरोग्य सेवेच्या नावाखाली लूट करणाऱ्यानी ऐन महत्वाचा काळात दवाखाने बंद केलेत अश्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटत होत्या.  दरम्यान काही सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संघ व सोशल मीडियावरील टिकांमुळे व प्रशासना समोर निर्माण होत असलेल्या अडचणीमुळे सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण, पो.नी.नितीन चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन तातडीने खाजगी दवाखाने सुरू करण्याबाबतच्या तंबी देण्यात आली. त्या अनुषंगाने शहरात पुन्हा खासगी दवाखाने सुरू झाले आहेत. ऐन संकटाच्या काळात पळ काढण्या ऐवजी मार्ग काढत खाजगी डॉक्टरांना ही आणखी जोमाने सेवा द्यावी हीच अपेक्षा तळोदेकर व्यक्त करत आहे तर दुसऱ्या गावातून शहरात सेवा देणारे डॉक्टरांनी दवाखाने आजही बंद ठेवले आहेत.  खरे पाहता आता आरोपाची व टीकाटिपणीची वेळ नाही. मात्र गरजेच्या वेळी पळ काढणाऱ्याना तळोदेकर कधीच विसरू शकणार नाही त्यांनी देखील सेवेसाठी सज्ज व्हावे अशी मागणी होत आहे.

चौकट**** 
        कोरोना संसर्गजन्य असल्याने संपकार्तून प्रसार होण्याची भीती आहे, परंतु डॉक्टरांनी सर्व प्रकारची दक्षता घेऊन नागरिकांना सुविधा दिल्या  पाहिजेत अन्यथा कोरोनाच्या संकटामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊन दुर्दैवाने त्यातून काही रूग्णांना मृत्यूलाच सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत खासगी दवाखाने सेवा पुरविण्यात असमर्थ ठरत असतील तर त्याबाबत तातडीने कार्यवाही करून किंवा खाजगी दवाखाने अधिग्रहीत करून शासनाच्या माध्यमातून चालवावे व लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी