निसर्ग चक्रीवाडळाच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार ; ना.के.सी.पाडवी
तळोदा:- निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई बाबत जे निकष शासनाकडून लावण्यात आले होते. तेच निकष शहादा तळोदा तालुक्यात आलेले वादळ हे चक्री वादळाप्रमाणेच असल्याने यात सुमारे 500 कोटी रुपयांचे घर पडझड, जनावरे, शेती पिकांचे नुकसान, विद्युत विभागाचे उपकेंद्राचे नुकसान झाले असल्याचे मत आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी व्यक्त केले आहे.
शुक्रवारी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी झाल्यावर त्यांनी तळोदा विश्राम गृहात भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. शहरासह ग्रामीण भागात काल (१२ जून) सायंकाळच्या सुमारास चक्री वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळ सुमारे 350 घरांचे नुकसान झाले असून सुमारे 200 झाडे या वादळामुळे कोलमडून पडले असून पत्रे उडणे, विद्युत पोल पडणे, भिंती कोसळणे आदी नुकसान झाले आहे तर 39 गावे या वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसणीतून बचावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील बोरद, खरवड, मोड, खेडले, धानोरा, आमलाड आदी गावातील घरांची पत्रे उडून अनेकांचे नुकसान झाले, दरम्यान सकाळच्या सुमारास मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तालुका प्रशासना सोबत जाऊन परिसराची पाहणी केली व तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली.
तर दुपारच्या सुमारास पालकमंत्री के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमाताई वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, नगरसेवक गौरव वाणी, सभापती रतन पाडवी, दीपक पाटील, जयसिंग माळी, खरेदी विक्री संघाचे पुरुषोत्तम मराठे, यासह जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा उपविभागीय अधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, शैलेंद्र गवते, विजवीतरण विभागाचे उपअभियंता सचिन काळे, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन वसावे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यासह विविध विभागातील विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. उपस्थितानी नुकसान ग्रस्तांची सांत्वन केली. दरम्यान त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी प्रशासनास दिले.
*केळीचे नुकसान*
तालुक्यातील 350 हॅक्टर वरील केळीचे तर काही प्रमाणात ऊसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी वर्तविला आहे. यासह सोनवड, पोल्ट्रीचा शेड उडून नुकसान झाले आहे. तर काही भागात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.
प्रतिक्रिया***
चक्रीवादळात तळोदा व शहादा तालुक्यात साधारणतः सुमारे 500 कोटीचे नुकसान झाले असून यात अनेकांचे घरांवरील छते उडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यात जनावरासोबत शेतकऱ्यांचे केळी, पपई आदी पिकांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण विभागाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले, निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई बाबत जे निकष शासनाकडून लावण्यात आले होते. त्याच निकषांच्या आधारे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे नामदार के.सी.पाडवी दिव्यमराठीशी बोलताना म्हणाले.
के.सी.पाडवी
आदिवासी विकास मंत्री तथा
पालकमंत्री नंदुरबार जिल्हा
Comments
Post a Comment