भाजप शहरअध्यक्ष यांची पत्रकार परिषद

तळोदा 

येथील जैविक इंधन पंपचा बांधकाम परवानगी न घेता मागील वर्ष भरापासून पंपाचे काम सुरू होते. याबाबत कुठलीही बांधकाम परवानगी संबंधित मालक व सहमालकाने परवानगी घेतलेली नव्हती व बेकायदेशीरपणे पंपाचे बांधकाम केले असल्याच्या आरोप शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आरोप केला .
         तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी भाजपचा गटात राजकीय तणाव असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सर्वसाधारण सभा तहकूब करण्याबाबत व सभेतील वादग्रस्त विषयांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 
              तळोदा नंदुरबार रस्त्यावरील चंदनविला समोरील पंपाचे बांधकाम करताना आवश्यक त्या कागदपतत्राची पूर्तता करून व बांधकाम शुल्क भरून बांधकामाला सुरुवात करणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही बांधकाम परवानगी घेण्यात आलेली नाही, त्यामुळे सदर बांधकाम पूर्णतः अवैद्य असल्याचा आरोप शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केला आहे. तळोदा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय सोनावणे यांनी या प्रकरणाबाबत कोणतीही चौकशी व सखोल माहिती न घेता, दिनांक 18 मे 2020 रोजी सर्वे क्रमांक 327/1 याठिकाणी बायोडिझेल पापं सुरू कर नेकमी नाहरकत मिळणेबाबत पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे विंनती पत्र दिलेले आहे. यावर योगेश चौधरी यांनी आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांनी 29 मे 2020 रोजी होणाऱ्या सभेच्या अगदी 10 दिवस अगोदरच सदर पंपासाठी नाहरकत मिळणेबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबाबत नेमके काय याची माहिती होणे आवश्यक आहे. यावरून सदर पंपाचे बांधकाम हे अवैद्य असून ते जमीनदोस्त करण्यात यावे व विजय सोनवणे यांची याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी,अश्या मागणीचे निवेदन त्यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी यांना दिले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
             याशिवाय श्री चौधरी यांनी बिअरबारसाठी पालिकेचा नाहरकत दाखला देण्याच्या विषय क्रमांक 45 बाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या स्थळी हे बिअरबार उभे राहणार आहे, तो भाग वर्दळीचा असून यांच्या सभोवताली हिंदू व मुस्लिम धर्मीय बांधवांचे प्रार्थनास्थळे आहेत, परिसरातील व्यापारी रहवासी यांचे नाहरकत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर मंथन करून नाहरकत देण्याची घाई करू नये.
     दरम्यान,हे दोन्ही विषय हे किल्ष्ट व गुंतागुंतीचे असल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व आठ नगरसेवक यांनी फेरविचार करून सदर विषय तूर्तास   चर्चा करून स्थगिती द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष परदेशी यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक रामा ठाकरे, हेमलाल मगरे,
प्रदीप शेंडे, दीपक पाडवी, राजू पाडवी हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी