प्रतिनिधी तळोदा:-- (किरण पाटील) तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत अजेंड्यावरील ३७ पैकी ३६ विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनकडून सत्ताधाऱ्यांना सहकार्याची भूमिका पहिल्या सभेत दिसून आली. तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षा नंतर तळोदा येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.या सभेला उपनगराध्यक्ष शितल पाडवी यांच्यासह पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी,भाजपचे गटनेते अजय परदेशी,शिवसेनेचे गटनेते अनुपकुमार उदासी,नगरसेविका रत्ना चौधरी,जयश्री महाले,अनिता परदेशी,प्रतीक्षा दुबे,प्रतोद शिरीष माळी,हर्षा पाडवी,लक्ष्मी नाईक, गायत्री पिंपरे,मीराबाई कोळी,अरव...
प्रतिनिधी तळोदा:--(किरण पाटील) शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन शहरातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय येथे शहिदी समागम निमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी मा. शेखर धनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व गुरु तेग बहादुर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तब्बल ३० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच निबंध स्पर्धेलाही विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनींनी शहिदी समागमाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमास देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतनदादा पवार, समन्वयक निमेश सूर्यवंशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे , तसेच संचालक महेश मगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शेखर ध...
प्रतिनिधी तळोदा:-- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची निवड तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७ मे २०२६ रोजी तळोदा येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सन २०२६-२७ करिता तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तळोदा येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक भरत भामरे, ईश्वर मराठे, दत्तात्रय सुर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सुधाकर मराठे, सम्राट महाजन, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दिपक मराठे, नारायण जाधव, महेंद्र सूर्यवंशी, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी उपस्थित होते. ...
Comments
Post a Comment