तळोदा पालिकेत काही नगरसेवक कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेणार ? जोरदार चर्चा

पालिकेतील वादा मूळ पदावर गदा ?
    अविश्वास ठरावाची चर्चा
काही नगरसेवक शिवसेनेत जाणार ?


तलोद्यातील राजकीय स्थिती अतिशय झपाट्याने बदलत असून  तळोदा पालिकेचे राजकीय स्थिती पाहता भाजपा मधील अंतर्गत कलह पाहता भाजप मधील एक नगरसेवकांचा मोठा गट व काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेनेत जाण्याची तयारीत असल्याचे खात्रीशीर वृत आहे,
           पालिकेतील वाद आता पदावर गदा आणण्यासाठी राजकीय खेळी पालिकेतील राजकीय  वर्तुळात सुरू झाली  असून
 कोंग्रेस च्या नगरसेवकांची  या सर्व  घडामोडीत काय भूमिका राहील ? यावर बरीचशी राजकीय गणित असणार आहे,
   

 
नवीन आदेशाची चर्चा -
राज्यातील लोकनयुक्त नगराध्यक्ष अथवा नगरसेवकाचा  माध्यमातून 
निवडलेल्या लोकप्रतिनिधीवर अविश्वास ठराव आणवयाचा असल्यास तळोदा पालिका नगरसेवक मधील संख्याबळ पाहता एकूण  ९ नगरसेवकांची स्वाक्षरी  तक्रारीत असणं आवश्यक आहे तसेच सभागृहात अविश्वास ठराव पारित करतांना एकूण १२, नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास पद जाऊ शकते तलोद्यात  उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव  बाबत दबक्या आवाजात चर्चा असून दोन्ही पदाधिकारी भाजपाचे असल्याने असे होणे  अशक्य वाटत असले तरी राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय सूड, व द्वेष  पडद्यामागील भूमिका मूळ राजकारण कधी रंग बदलेलं सांगता येत नाही,
त्यामुळे सर्व शकत्या राजकीय पटलावर पडतळुन पाहिल्या जात आहेत,

राज्यात कोंग्रेस शिवसेनेचे सरकार असल्याने  वरिष्ठ पातळीवर एकत्रिकरणं होण्याची शकत्या नाकारता येत नाही,

  कोंग्रेस च्या नगरसेवकांची भुमिका अतिशय महत्वाची असणार आहे,

 तळोदा पालिकेतील विरोधी गटातील कोंग्रेस मधील दोन नगरसेवक  शिवसेना सोबत  जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे,

त्यामुळं आता काँग्रेस मधील ते दोघ नगरसेवक काय भूमिका घेतात यांवर बरेचसे राजकीय गणित भविष्यात ठरणार आहे, 


भाजप गट स्थापन करणार असल्याची चर्चा -
भाजपा मधील गटबाजी मधून पुढील  काळात अधिकच राजकीय तणाव वाढल्यास  निर्णय घेतांना दबाब वाढू शकतो हे लक्षात घेता भाजप मधील काही लोकप्रतिनिधी स्वतः ची वाटचाल सुकर करण्यासाठी  गट स्थापन करणार असल्याची देखील चर्चा पालिका वर्तुळात आहे,

शहर अध्यक्ष योगेश चोधरी यांच्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केल्याचे दिसून आले असून बायो पेट्रोल पंप व
बियर बार ना याना पालिकेचा ना हरकत परवाना विषयांवर तांत्रिक मुद्दे उपस्थित करत असतांना पालिका प्रशासन सोबतच नगराध्यक्ष यांच्या बद्दल देखील वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळं हि राजकीय दरी आता अधिकच वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत,


चंद्रकांत रघुवंशी यांची आमदार वर्णी लागणार ?
राज्यात एकुण १२ आमदारांचा जागा येत्या काही  दिवसात रिक्त होणार आहेत त्यात शिवसेच्या कोट्यातून त्यांची वर्णी  लागण्यासाठी प्रयत्न सुरू असून धुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना संघटन मजुबत करण्यासाठी संघटन तसा निर्णय घेऊ शकते तसे झाल्यास तलोद्यातील कोंग्रेस मधील त्यांचे जुने सहकारी व भाजप मधील नाराज गट यांची सेना इन्ट्री पक्की समजली जात आहे,
तलोद्यात रघुवंशी यांची क्रेझ असल्याने सेना प्रवेशाचे आमदार पद हे निमित्त ठरू शकते,
  

2017  पालिका सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव आणला तरी त्याचा बाबत अंतिम निर्णय अधिकार नगर विकास अधिकारी कडे होता मात्र राज्यात सत्ता बदल नंतर मात्र आता नवीन मार्गदर्शक सूचना
 देण्यात आल्या आहेत



पक्षीय बलाबल -
नगराध्यक्ष 
भाजप ११
कोंग्रेस ६
शिवसेना १

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?