*भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिग्विजय माळी यांची निवड*
शाश्वत विकास व लोकशाहीसाठी विविध उपक्रम राबवणारी तसेच देशातील तरूणांना दिशादर्शक ठरणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिग्विजय माळी यांची निवड करण्यात आली.
ऑक्सिजन फाऊंडेशन व दिग्विजय प्रतिष्ठानचे संस्थापक दिग्विजय मगनलाल माळी यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ दत्तचना मूर्ती रामू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याध्यक्ष त्रेवीनीकुमार कोरे, सचिव कमलेश सोनवणे यांनी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाचा बैठकीत त्यांची नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली आहे.
Comments
Post a Comment