तळीरामाना आवर घालण्यासाठी पोलीस नेमण्याची मागणी

तळोदा:-(कालीचरण सूर्यवंशी) देशभरात कोरोनाचे वाढणारे रुग्ण आणि निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता ४ मे ते १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशी विभागणी राज्य सरकारने केली आहे. तसेच या तिसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यात काही सवलती राज्यसरकारने दिल्या आहेत. यात रेड झोनमधील कंटेन्मेंट झोन वगळता दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी त्यांचा सोशल मीडियाच्या अधिकृत पेजवर दिली. सदर माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यात वाइन विक्री करताना सोशल डिस्टन्स राखून विक्री करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. सदर वृत्त तळीरामाना दिलासादायक ठरले असून अनेकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच वाईन मालकांना देखील दिलासा मिळाला आहे. मात्र 40 दिवसापासून बंद असलेल्या वाईंनच्या दुकानी अचानक सुरू होणार असल्याने तळीरामाची गर्दी उसळेल याचा अंदाजा विक्रेत्यांनी घेतला असून पूर्व उपाययोजना व नियोजन म्हणून सायंकाळीच वाईन शॉप समोर 6 फूट अंतर ठेव चुन्याच्या सहाय्याने वर्तुळ आखण्यात आलेले आहेत. यासोबतच वाईन शॉप समोर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस नेमावा अशी मागणी दारू विक्रेत्यांनी केली आहे. यासोबतच उद्या ऐतिहासिक दारू विक्री होईल असा अंदाजा व्यक्त करण्यात येत आहे. दुकाने सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात झुबड उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
             नंदुरबार जिल्ह्यात येणारे विदेशी मद्य नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या ठिकानाहून येत असल्याने व यातून काही जिल्हे रेड झोण असल्याने याठिकाणची वाहतूक ठप्प असल्याने विदेशी मद्यसाठा अपुरा पडणार आहे. त्या दृष्टीकोनातून या मुबलक साठा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती मुभा द्यावी अशी मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी