मताचा राजकारणासाठी बाहेर येणाऱ्या लोंढ्यावर कोणी बोलेना....
तळोदा:- बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांबद्दल शहरी व ग्रामीण भागात बाहेर भीती व्यक्त कऱण्यात येत आहे.सामाजिक व राजकिय कार्यकर्ते दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे पुढे करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे.मात्र,त्याचा परिमाण आपल्या "वोट बँक"वर होऊ नये म्हणून अधिकृतपणे कोणीही तक्रार करायला पुढे येत नसल्याचे चित्र आहे
मंत्रालयाने नुकतेच परराराज्यात व मोठया शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना अटी-शर्तींना अधीन राहून स्वगृही आणण्याचा निर्णय घेतला आहे.काही मजूर मिळेल त्या वाहनाने प्रसंगी पायी खाजगी वाहनाने लोक गावी परतत आहेत.यांतील अनेक जण हे कोरोनाग्रस्त भागांतून परतत आहेत.परतणाऱ्या नागरीकांना पंधरा दिवस होम कॉरटाईन राहावे लागणार आहे.परंतु परतणारे हे लोक होम कॉरटाईन कितपत पालन करतील,याबाबत शंकाच आहे. त्यामुळे या लोकांबरोबर कोरोना देखिल आपल्या गावांत शिरण्याची भीती ग्रामिण भागात दिसून येत आहे.
अश्या लोकांना गावात घेण्याबाबत ग्रामिण भागांत विविध मतमतांतरे दिसून येत आहे.राजकिय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी अश्या लोकांना गावात येऊ देऊ नये,त्यांना विलीगिकरण कशात ठेवावे व नंतर गावात घ्यावे,अशी अनेक गावकऱ्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. परंतु यामुळे वोट बँकेला फटका बसू शकतो,हे अनेक मंडळी जाणून असून कोणीही उघडपणे याबाबत भूमिका घेतांना दिसून येत नाही.
दरम्यान आपली अडचण घेऊन हे ग्रामस्थ सरळ गाव पुढारी आजी माजी सरपंच, प,स, सदस्य, जी,प, सदस्यांना या बाबत दाद मागत आहेत मात्र ते देखील स्वतः पुढाकार घेण्यास तयार नाहीत कारण हक्काचा मतदार तुटण्याची व वाद वाढण्याची भीती असल्याने प्रसिद्धि माध्यम व अधिकारी यांना संपर्क करून माझं नाव येऊ देऊ नका पण इतकं करा, अशी मागणी करत आहेत.एकूणच प्रशासन कडून या आजाराला आळा घालण्यासाठी सर्वांच सहकार्य घेतलं जातं आहे. अपूर्ण पोलीस दल त्यातच गाव पातळीवर असणारे पोलीस पाटील यांचे गावातील संबंध या मूळ वाईटाचा वाटा घेण्यास कोणीही तयार नाही,
तक्रारदार पुढे येत नाही -
दरम्यान शहरात सह तालुक्यात बाहेर गावाला नोकरी व कामानिमित्त असलेलं लोक आपल्या गावी परतत आहेत मात्र गाव पातळीवर स्वतः चे हितसंबंध खराब होऊ नये म्हणून कोणीही तक्रार साठी पुढं येत नाही, काही ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाला कळविल्याचा राग आल्याने १५ दिवस कोरोन्टीन केल्याने वाद देखील होत आहेत, त्यामुळं बाहेरील कोणी आलं असेल तरी नाव सांगून उगाच वाद अंगावर घेण्यास कोणीही तयार नाही,
Comments
Post a Comment