मॉर्निंग बुलेटीन तळोदा एक्सप्रेस

कोरोना संकटात आमलाड येथील विलगीकरणं कक्ष ठरत आहे लाभदायी
      प्रतिनिधी तळोदा
 आमलाड येथील विलगीकरण कक्षात आतापावेतो तब्बल तीन हजार एकशे 71 नागरिकांची तपासणी करण्यात आली तर 73 जणांना तेथेच संस्थात्मक विलगीकरणं करून ठेवण्यात आले. त्यात तालुक्यात कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांची तपासणी अव्याहतपणे आमलाड येथे सुरू आहे. यामुळे तालुक्यात कोरोनाच्या शिरकाव अजूनतरी होऊ शकलेला नाही. त्यामुळे कोरोना काळात येथील विलगीकरण कक्ष व तेथील आरोग्य पथकाची सेवा तालुक्यासाठी लाभदायी व बहुमोल ठरत आहे.
       कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना तपासणी व विलगीकरणं करणे आवश्यक असल्याने तालुका प्रशासनाने आमलाड येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले होते. यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा ,तहसीलदार पंकज लोखंडे ,पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण ,गटविकास अधिकारी सावित्री खर्डे ,मुख्याधिकारी सपना वसावा व तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत विलगीकरणं कक्षाची कार्यवाही केली होती.
          त्यात या विलगीकरणं कक्षात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली 24 तास वैद्यकीय पथक कार्यरत आहे. येथील वैद्यकीय पथकाने आतापावेतो तब्बल तीन हजार एकशे 71 नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना कोरोना काळात सुरक्षित केले आहे. त्यात 73 नागरिकांना तेथेच विलगीकरणं करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. सध्या 29 जणांना विलगीकरणं करून ठेवण्यात आले आहे. त्यात अक्कलकुवा येथील कोरोना पोजिटिव्ह महिलेच्या संपर्कातील चार जणांना येथेच विलगीकरणं करण्यात आले होते. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्याने सुटकेचा निःश्वास सोडला होता.
          तालुक्यात कोरोना बाधित क्षेत्रातून व बाहेरील जिल्ह्यातील नागरिक मोठयाप्रमाणात आले होते. आता गुजरात राज्यात रोजगारासाठी गेलेले मजूर परतत आहेत. त्यांचीही तपासणी करून त्यांना विलगीकरणं करण्यात येत आहे. त्यांना शिक्का मारून घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या शिरकाव तालुक्यात होऊ शकलेला नाही.त्यामुळे येथील विलगीकरणं कक्ष तालुक्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नागरीकांनी मास्क वापरावेत व शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
        येथील आरोग्य पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  महेंद्र चव्हाण, डॉ विशाल चौधरी, आरोग्य सेविका एस,एस,वळवी, इरला गवळी, लीला साळवे, सुनंदा चौरे आरोग्य सहायक डी,बी,गवळी, आरोग्य सेवक जी,बी, बोरसे , मनोज पिंजारी,राहुल मालकर, विकास सुसर व इतर अनेक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तळोदा येथे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणाहून आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्या महिलेने प्रवासादरम्यान भेट दिलेल्या भागातील 387 कुटुंबांची होम टू होम दोन वेळा आरोग्य तपासणी येथील आरोग्य पथकाने केली. मात्र कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. 
       त्यासोबतच आतापावेतो एकट्या गुजरात राज्यातून मजुरीसाठी गेलेल्या व परत आलेल्या मजुरांची संख्या दोन हजाराच्या वर आहे. त्यामुळे येथील विलगीकरण कक्ष तालुक्यासाठी लाभदायी ठरला आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांवरील ताण पाहता या विलगीकरण कक्षात अधिकाधिक सुविधा वाढविण्याची गरज आहे.


  भारतीय सेनेच्या तिन्ही दलांनी आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धांच्या दि.3 रोजी सन्मान केला आहे. कोरोनाच्या या संकटात वैद्यकीय अधिकारी , परिचारिका ,आरोग्य सेवक अहोरात्र सेवेत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेतील सर्वच कर्मचारी कौतुकास पात्र असल्याची भावना जनमानसात आहे. त्यामुळे येथील विलगीकरणं कक्षाचे महत्व अजून अधोरेखित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी