तळोद्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये एक घर एक किट च्या माध्यमातून लोकप्रतिनिधींची गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत

प्रतिनिधी तळोदा

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लोकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. परिणामी हातावर पोट भरणाऱ्यांची  उपासमार होऊ नये, यासाठी ठीक ठिकाणी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. तळोदा येथे  देखील  लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य पार पडत मदतीचा हात पुढे केला आहे.तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये    उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी व नगरपालिका बांधकाम सभापती रामानंद ठाकरे यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे किटचे प्रभागात वाटप केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी विशेष कौतुक केले  आहे.

 तळोदा शहरात-अनेक जण हात मजुरी तसेच हात गाडी लावून छोटे मोठे व्यवसाय करुन  आपले पोट भरतात. अशा हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेची लॉक डाउनच्या काळात आर्थिक कारणास्तव उपासमार होऊ नये यासाठी उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी व पालिका बांधकाम सभापती रामानंद ठाकरे यांनी नगरपालिका प्रभाग क्षेत्र क्रमांक एक मध्ये स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून वाटप केले आहे. तांदूळ, डाळ, साखर, कांदे ,लसूण, बटाटे व एक किलो गोडेतेल अशा स्वरुपात एकूण आठ किलो वजनाचे एक किट तयार करण्यात आले आहे. प्रभागात असे एकूण ५३५ किटचे वाटप करण्यात आले आहेत.  १ मे महाराष्ट्रदिन व कामगार दिनाचे औचित्य साधत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी ,प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, भाजपा शहराध्यक्ष योगेश प्रभाकर चौधरी, यांच्या हस्ते सदर जीवनावश्यक किट वाटपाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी विरसिंग पाडवी, आमदार स्विय सहाय्यक विलास डामरे, नगरसेवक हेमलाल मगरे, दीपक पाडवी, प्रदीप शेंडे, योगेश कांतीलाल चौधरी, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक चावडा, कौशलकुमार सवाई, प्रमोद चौधरी, मनोज परदेशी, लाडयाभाऊ , गणेश चौधरी मकसूदभाई आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी