मॉर्निंग बुलेटीन तळोदा एक्सप्रेस

अखेर वन विभागाच्या ट्रॅप केमेऱ्यात बिबट कैद

प्रतिनिधी  तळोदा -   
 आमलाड शिवारातील नितीन वाणी   यांच्या शेतात बिबटया ने  दोन कुत्र्यावर हल्ला करून व  शेतात  काम सुरू असतानाच दिवसा आणखी एक पाळीव कुत्रावर हल्ला करत त्यास ऊसाचा शेतात घेऊन गेल्याने दिवसा मुक्त संचार मूळ दहशत पसरली आहे या बाबत नगरसेवक गौरव वाणी  यांनी  पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी केली होती याची दखल घेत वन विभागाने दोन ट्रॅप केमॅरे लावले होते त्यात  मंगळवारी रात्री बिबट्या चे काही छायाचित्रे केमरे ने कैद केले असून बुधवारी  सकाळी या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला  असून आता बुधवारी रात्री वन विभागाचे कर्मचारी देखील एका झोपडीत दबा धरून बसणार आहेत,
 त्यामुळं आता बिबट कधी जेरबंद होतो या कडे लक्ष  लागून आहे
 आमलाड येथील शेत शिवारात रात्रींच्या सुमाराला बिबट्याने त्यांचा पाळीव कुत्र्याचा फडश्या पडल्याची घटना काही दिवसापूर्वीच घडली असताना सतत त्याचा वावर वाढला होता. याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत होते,
        
         आमलाड शेत शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली  असून. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवेंद्रलाल वाणी यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला व त्यास  बहुरुपाकडे जबड्यात ओढून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते
         दरम्यान वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या लवकरात  लवकर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वनक्षेत्रपाल रोडे यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी