आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन्यजीव गणना
मॉर्निंग बुलेटीन तळोदा एक्सप्रेस
प्रतिनिधी तळोदा
कोविड १९ मूळ रोगाचा प्रसार ची काळजी घेत प्राणी गणना रद्द करण्यात आली मात्र आता आटोमॅटिक केमेऱ्याचा ट्रॅप द्वारे प्राणी गणना होणार आहे , या निमित्त नंदुरबार वनक्षेत्रात वेगवेगळ्या पाणथळ असणाऱ्या जागी एकूण १० ट्रॅप केमरे लावण्यात आले आहेत,
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी राज्यातील विविध वनक्षेत्रात वन्यजीव गणना रात्री मचाण लावून गेली जाते यात विविध शहरी भागातून वन्यजीव प्रेमी हजेरी लावत असतात, मात्र यंदा कोरोना आजार मूळ मचाण वर सोशल डिस्टिंशिंग पाळली जाणार नाही तसेच वन्यजीव देखील बाधित होण्याची भीती पाहता गणना रद्द करण्याचे आदेश होते,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर -
वनक्षेत्रात माहिती घेण्यासाठी ट्रॅप केमेऱ्याचा वापर इतर वेळी होत असला तरी संपूर्णपणे त्याचावर प्राणी गणना प्रथमच होत आहे , अनेकदा रात्री मचाण वर बसलेल्या व्यक्तिला आवाज वरून प्राणी ओळखावा लागतो,
मात्र केमेऱ्या मूळ रात्री देखील स्पष्टपणे फोटो येत असल्याने निश्चितच हे पाऊल उपयुक्त होणार असून
यातून दुर्मिळ वन्यजीव बाबत माहिती उपलब्द होणार आहे,
तळोदा वनक्षेत्रात एकूण आठ ठिकाणी तर नंदुरबार वनक्षेत्रात एकूण दहा ठिकाणी केमरे लावण्यात येणार आहे,
Comments
Post a Comment