तलोद्यात उद मांजरावर बिबट्या चा हल्ला
- तळोदा तालुक्यातील धानोरा पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बापू पाटील
यांचा मालकीच्या शेतात उद मांजर प्रकारातील दुर्मिळ मांजर मृतावस्थेत आढळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पहाटे त्यावर बिबटया वाघाने हल्ला केला असल्याचे वन विभाग कडून सांगण्यात आले,
प्रामुख्याने रात्रीच दिसणारे हे मांजर हल्ला झाल्याने ठार झाले ,
धानोरा येथील शेतात काम करणाऱ्या जागल्यास सकाळी हा प्रकार लक्षात आला,
दरम्यान हे दुर्मिळ प्रकारातील मांजर पाहून आश्चर्य व्यक्त केले. परिसरातील नागरिकांनी मांजर पाहण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती त्वरीत वनविभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उद मांजराचा पंचनामा केला. रात्री वावरणारा प्राणी
उद मांजर हा प्राणी जंगलात बीळ करून राहतो उद मांजर हे बहुतेकदा स्मशानाजवळ आढळते. राज्यातील घनदाट जंगलांमध्ये हा प्राणी आढळतो. अशी माहिती वन्यजीव अभ्यासक यांनी दिली आहे.
हा प्राणी खातो काय ?
हा प्राणी मिश्र आहारी आहे. मिश्र आहार म्हणजे, अर्थात शाकाहार नी मांसाहार. सिवेटला शाकाहारामधे झाडाची फ़ळे, फ़ुले आवडतात. आणि मांसाहार म्हणजे खेकडे , उंदीर , बेडूक, किडे,पाली, लहानसहान साप आणि कधीकधी पक्षी आणि त्यांची अंडी यांना आवडतात. उदमांजराचं पाम सिवेट हे ईंग्लिश नाव कसं आलय तर पामच्या झाडावर नीरा निघते , त्यासाठी झाडांवर मडकी लावलेली असतात. ह्याला त्या मडक्यांमधला रस पिऊन टाकायला आवडतो म्हणुनच खुप वेळेस ह्या प्राण्याला आपण रात्री ह्याच झाडांवर पाहू शकतो. म्हणुनच याला पाम सिवेट नाव मिळालय.
दरम्यान तळोदा तालुक्यात हा दुर्मिळ नर वन्यजीव आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
Comments
Post a Comment