मदत अवश्य करा पण चमकोगिरी थांबवा

मदतीचा हात का चमकोगिरी ?

प्रतिनिधी तळोदा
सर्वत्र सोशल मीडियावर गोर गरिबांना मदत करणार्यांना आम्ही कशी मदत करत  आहोत याचे फोटो  सर्वत्र  फेसबुक व व्हाट्सऍप्सस ग्रुपवर फिरत आहेत, सध्या इनबॉक्स या मेसेज व फोटोनी ओसंडून वाहत आहे, मदत करतांना फोटोची खरच गरज आहे  का ?  असा प्रश्न आता विचारला जात आहे
तो गरजू आहे अडलेला आहे , भिकारी नाही मित्रानो मदत करा पण केमेऱ्या व मोबाईल घरी ठेवुन या अशी चपराक आता सोशल मीडियावर उत्तर दाखल उमटत आहे,
 गरिबांना अन्नदान, मास्क वाटप, साबण वाटप, कपडे वाटप,  याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हाट्सऍप् व फेसबुकवर टाकले जात असून खरोखरच मदत करताय की चमकोगिरी करतात असा प्रश्न आता चिडलेल्या नेटकरी कडून विचारला जात आहे,

 मागील काही दिवसांपासून कोरोना चा प्रभाव तळोदा तालुक्यात ग्रामीण भागात देखील जाणवू लागला आहे, यात काही समूह प्रामाणिकपणे स्वतः हुन झोकून काम करत आहेत तर काही फकट फोटो काढून तीळ एवढी मदत करून गूळ एवढी प्रसिद्धी घेत आहेत तर काही हजारो रुपये गुप्तदान करून दानाचे पावित्र्य जपत आहेत

 दात्यांनी फोटो स्पर्धा -
तलोद्यात काही सामाजिक  संघटन व काही तरुण राजकीय नेते सतत सामजिक उपक्रम राबवून निस्वार्थ सेवा देत असतात हे नाकारता येणार नाही मात्र हल्ली मदत तीळ एवढी व प्रसिद्धी गुळ एवढी अशी स्थिती झाली आहे,
  
कोरोना आजार पसरू नये म्हणून केंद्र सरकार कडून लॉक डाऊन देशभरात झाल्याने असंख्य स्थानिक गोर गरीब हातमजुरी करून उदर निर्वाह करणारे लोकांना  मदतीची  आवश्यकता आहे,
मात्र ती करत असताना  फोटो सोशल मीडियावर टाकण्याची जणू काही स्पर्धा लागली आहे,

 यात राजकीय व्यक्ती देखील मागे नसून हि लागण सर्वांनाच झालेली दिसते त्यांनी वाटप केले म्हणून आपण पण करू अशी भूमिका दिसते असंख्य ग्रुपवर तर याच फोटोनी कहर केला आहे

खरे सेवेकरी मात्र कामात -
स्वतःहून सामाजिक कामात झोकून देणारे काही युवक तलोद्यात असून अपघात, मयताचे घर, अग्नी उपद्रव, पावसाळ्यात धान्य बाजार  अथवा कोणत्याही दुकानात पाणी शिरल्यास ,तसेच गरीब लोकांना अन्नदान असे उपक्रमात स्वतः झोकुन देनारे तरुण  मात्र या स्पर्धेत कुठंच दिसत नाही त्या मूळ आता तलोद्यात खरे  स्वयंसे पडद्याआड तर चमकोगिरी करणारे पुढे  पुढे दिसत आहेत
       
  सुनील  सुर्यवंशी तळोदा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी