मरी जायजो कोरोना,,,,,,,,
कालीचरण सुर्यवंशी..
तळोदा:- ये ,,,इधर.….. इधर,.. इधर..... जिंदगी को दाव पे लगाती लडकीया.... देखीये,चलो.... शो चालू और जल्द ही शूरु होने वाला है....... मौत का कुवा..... मौत का कुवा
असा कानठल्या बसणारा आवाज आणि त्यातच मध्ये हिंदी चित्रपट मधील गाणं.....
अशी तळोद्याची प्रसिद्ध यात्रा दरवर्षी उत्साहात भरायची,यंदा मात्र कोरोनामुळे यात्रेच्या ठिकाणी निरव शांतता पसरली आहे......कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी तळोद्याची यात्राच रद्द करण्यात आल्याने उत्साह व आनंदावर विरजण पडले आहे..
परीक्षा संपल्यानंतर व सुट्टी लागल्यावर तळोदा शहरातील व तालुक्यातील मुलांचे मुख्य आकर्षण म्हणजे तळोद्याची यात्रा. वर्षंभर काही वस्तू भले भेटतील पण तरी जी यात्रेत फिरून आई वडिलांजवळ हट्ट धरून ती वस्तू घ्यायला भाग पडण्याची हक्काची जागा म्हणजे यात्रा.तलोद्याच्या यात्रेत सर्वांच्याच कडू-गोड आठवणी गुंफलेल्या आहेत. सुट्टीत मामाकडे येणारी, तर यात्रेत गावी येणारी मंडळी मोठया संख्येचे असतात. संध्याकाळी सर्व कुटुंबातील सदस्य यात्रा पहावयास जातात,तर नवीनच पान सुपारी व साखरपुडा झालेल्या जोडप्यासाठी यात्रा म्हणजे सोबत फिरण्याची पर्वणी... लग्न ठरलेल्या जोडप्यासाठी तळोद्यात महानगरासारखी सोबत एकत्र बसून गप्पा मारायला हक्काची जागी नाही किंवा तशी संधी देखिल त्यांना नसते.मात्र तळोद्याची यात्रा ही लग्न ठरलेल्या जोडण्यासाठी ती संधी देखिल घेऊन येत असते. घरांचा खास परवानगी गरज तळोदा यात्रेत नसते, तसा पारंपारिक रिवाजच आहे.यावर्षीची यात्रा रद्द झाल्याने लग्न ठरलेल्या जोडप्यांना त्या "सुवर्णसंधी"ला देखिल मुकावे लागले आहे.त्यातच कोरोणामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलली गेली असल्याने त्यांना यात्रा रद्द झाल्याचे चांगलेच जिव्हारी लागल्याचे चित्र पाहायला आहे.
समवयस्क मुलींचा घोळक्यांचे मागे मागे इच्छा नसतांना,"त्या" गेल्यात म्हणून जाणारे ,अगदी 'जादू के आयना', 'उसाचा रस' व 'लिंबू सरबत' पिणारे अवलिया पण तलोद्याच्या यात्रेत दिसून येतात. काहींना तर याच तळोद्याच्या यात्रेच्या ठिकाणी त्यांना आपला "पहिलं प्रेम" देखिल भेTटलं आहे.काहींना तर यात्रेनिमित्त त्यांच पहिलं प्रेम गावकडे परतल्याचा आनंदी अजूनही तलोद्याची यात्रा देऊन जाते. निदान यात्रेत तरी दिसेल अशी अपेक्षा बाळगून झुरणारे पण यात्रेत भेटतात. एकमेकांना पाहतात व पुढील आयुष्या साठी मार्गस्थ होतात. तर नशिबावर अर्थात भविष्यावर कधीही विश्वास न ठेवणारे देखील गंमत म्हणून हात दाखवत ते पण मागे पडल आणि मशीनच्या मदतीने भविष्य स्पीकर वर बोललं जाई त्याची पण मजा असे, अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर सोन खरेदी करणारा वर्ग जरी सोनार गल्लीत गर्दी करत असला तरी यात्रेत पिवळ्या रंगाचि पोलिश असणाऱ्या दागिने घेण्यासाठी देखील यात्रेत गर्दी होत असे त्याला मीना बाजार म्हणत एकूणच गरीब व गर्भ श्रीमंत व मध्यमवर्गीय ला सर्वांना आपली वाटणारी यात्रा,,,,,यंदा नाही
शहरातील यात्राने वेगवेगळ्या समाज्याच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे कामं केले आहे .गावातील यात्रेची तारीख जरी नुसती जवळ आली तरी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर चमकलेली दिसते. गावातील सर्व समाजातील नांदायला गेलेल्या लेकी -बाळींना माहेरी येण्याचा हक्काचा उत्सव म्हणजे यात्रा होय.
चौकात स्वागतासाठी उभारलेलें डिजिटलबोर्ड, पाहुणे , नातेवाईक यांनी शहर अक्षरशः गजबजून जाते. पाहुणे मंडळींनी घरे अगदी भरून जातात ..विविध पकवन्न तयारी चालू असते, तर काहींनची यात्रेसाठी विविध खरेदी सुरु असते ..एकंदरीत आनंदोत्सव सुरु असतो सर्व घरांत . मात्र यंदा सर्व शांत शांत दिसून येत आहे,
मधूनच यात्रेत फिरतांना आवाज एक का दस एक का दस माल लगाव माल मिलेंगा,,,,,, हा आवाज आता मागील कित्येक वर्षे पासून बंद झाला आहे, यंदा मात्र कोरोना मूळ सर्व व्यवसायाला फटका बसला असून मसाला, कांदे, टरबुज, पाळणे, फुगवाले, उसाचा रस,विक्री करणारे लहान मुलांचे खेळणे विक्री करणारे गरीब व छोटे मोठे व्यपारी, असे असंख्य लोक ज्यांची पावसाळ्यात आर्थिक नियोजन होत असते अश्या अनेकांना आर्थिक नाही तर सरळ पोटावर फटका बसला आहे, लस्सी, सरबत, बनावट ईन्सन्स टाकलेला का असेना पण आमज्यूस , इथं जबरदस्त गर्दी घरी परत येताना उसळत असे, पुणे ,मुंबई, शहरात राहणारे देखील तलोद्यात यात्रा हजेरी लावल्या शिवाय राहत नाही,,
चित्रपट गृहाचे आकर्षण -
पूर्वी चारही शो बघणारे दर्दी सिनेरसिक होते यात्रेत सुभाष चित्र मंदिर व कल्पना टॉकीज ला कोणता चित्रपट लागेल याच आकर्षण असे,,, एक खुल चित्रपट गृह देखील होते ते कधीच बंद पडले तर हळूहळू केबल वर चित्रपट, न परवडणारे टेक्स या मूळ दोघ चित्रपट गृह बंद पडले मात्र तो पण एक काळ होता,,,,,गुजरात, माध्यप्रदेस, भागत प्रसिद्ध असणाऱ्या बेल बाजार देखील यंदा न भरल्याने अनेक बेरोजगार लोकांचा रोजगार गेला,,,,,,,, अक्षय तृतीया ला नवीन बेल जोडी घेण्याची प्रथा अजूनही टिकून आहे,,,
आज सकाळी ज्या भागात यात्रा भरते त्या परिसरात जुन्या आठवणी पाय वळले आणि मन सुन्न झाले माणसाने कितीही प्रगती केली शहरात आयुष्य काढलं तरी गावाकडची यात्रा ची बातच न्यारी कारण त्याला आनंद सोबत भावना व संवेदना जुळलेल्या असतात*✒
सभार तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ
खूप छान संकलन भाऊ
ReplyDeleteछान सर मस्त 👍🙏👌
ReplyDeleteखुपच सुंदर वर्णन गतकाळातील चित्र जिवंत उभे राहीले सरजी क्या बात👏👏👌
ReplyDeleteखूप सुरेख भाऊ 👌👌👌
ReplyDeleteयात्रा डोळ्यासमोर आली पूर्ण आणि यात्रेत घालवलेले बालपणीचे तारुण्याचे दिवसांची सुद्धा आठवण करून दिलीस 💐🌺💐
खूपच छान लेखन....
ReplyDeleteभाऊ अप्रतीम
ReplyDeleteखूप छान सरजी
ReplyDeleteसर्वांचे आभार
ReplyDeleteछान.... गुजरे जमाने याद आते है
ReplyDeleteछान.... गुजरे जमाने याद आते है
ReplyDeleteApratim
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूपच छान सरजी, आणि शीर्षक ही लई भारी...👍😊👌😊👌👍 जुन्या आठवणी डोळ्या समोर आल्यात.... आणि जणू यात्रेत फेरफटका मारून आल्या सारखे जाणवले, ह्या वर्षी यात्रा जरी भरत नसली, तुमच्या शब्द शैलीमुळे मन नकळत यात्रेत फिरून आलं...😊😊
ReplyDeleteसर जी!अप्रतिम लिखाण.
ReplyDeleteयात्रेच्या आठवणींना उजाळा दिलात...!!
Sachitra varnan Khup chaan
ReplyDeleteक्या बात है कालू सर,रातका 12 से 3 का शो देखना,प्याऊ(पाणपोई)या बैल बाजार में रसीद काटने का काम मिलाने के लिए किसी नगरसेवक या बडे व्यक्ती की शिफारस से काम मिलाना,टरबूज लेकर मेलेमें ही दोस्तो के साथ खाना,झुले में बैठना, मौत का कुवां,पानी भरे गुब्बारे,बासुरी...जाने कहॉं गये वो दिन...
ReplyDelete