Posts

Showing posts from April, 2020
Image
आदिवासी मजूरांना धान्य वितरणाचा शुभारंभ लॉकडाऊन परिस्थितीत बेरोजगार झाल्याने राज्यातून किंवा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या आदिवासी जमातीतील मजुरांना भोजनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धान्य खुल्या बाजारात न विकता आदिवासी मजुरांना वाटप करण्याचा शुभारंभ पालकमंत्री पालकमंत्री  ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. महामंडळाकडील धानाची भरडई करून पॅकिंग केल्यानंतर  धान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. भरडई होईल तसे हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. सबंधित जिल्ह्यांच्या मागणीनुसार हे धान्य देण्यात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. साभार जी, मा,का, नंदुरबार

आमलाड शिवारात बिबट ची दहशत

Image
प्रतिनिधी  तळोदा - नगरसेवक गौरव वाणी यांच्या आमलाड येथील शेत शिवारात रात्रींच्या सुमाराला बिबट्याने त्यांचा पाळीव कुत्र्याचा फडश्या पडल्याची घटना घडली. याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे...                   आमलाड शेत शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवेंद्रलाल वाणी यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला व त्यास  बहुरुपाकडे जबड्यात ओढून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.         वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करा अशी मागणी करण्यात येत आहे.
Image
कार्यआरंभ आदेश नसताना काम सुरू चॉकशी ची मागणी प्रतिनिधी तळोदा  येथील प्रभाग क्रमांक एकमधे लॉकडाऊनच्या काळात सुरु असलेल्या बेकायदेशीर कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.              याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्याचे आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा नगर पालिका हद्दीमधील प्रभाग क्रमांक एक मधिल धानकावाड़ा परिसर व शंकर पार्वतीनगरमधे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाऊन काळात देखील बेकायदेशीरपणे गटार बांधकाम करने व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे आदि कामे ही कामे सुरु आहेत. नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा कार्य आरंभ आदेश न देता सुरु करण्यात आलेली असून नगरपालिकेचे काही पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगमताने सदरील कामे सुरु असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.            या संदर्भात ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखिल लेखी तक्रार करण्यात आली असून त्याची प्रत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देखिल सादर करण्यात आली होती.मात्र,...

रमजान ची नमाज घरातच अदा करा,,,, निसार दादा मक्राणी

Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमझान ची नमाज घरातच अदा करा -निसार मक्राणी (प्रगतशील शेतकरी)  प्रतिनिधी तळोदा  :-प्रत्येक मुस्लिम बांधवांनी  रमजान  महिन्यात मशिदीमध्ये न जाता घरातच सामाजिक अंतर ठेवून नियमित नमाज अदा करावी सोबतच शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येकाने कोरोणाचा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील रहावे . असे आवाहन प्रतापपूर येथील प्रगतिशील शेतकरी निसारअली मक्राणी यांनी केले आहे.   सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून  मुस्लिम समाजातील लोकांकडून रोजा ठेवला जात आहे.रोजा सोडण्यापूर्वी मशिदीत जाऊन सामुदायिक नमाज अदा करणे हे प्रथम कर्तव्य मानले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सध्याच्या काळात मशिदीत जाऊन नमाज अदा करता येऊ शकत नाही.म्हणून प्रत्यकाने आपापल्या घरीच  नमाज अदा करावी असे आवाहन तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथिल शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी निसार मक्राणी यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे.  आधीच्या काळी देखिल मस्जिद नव्हत्या , मंदिर नव्हते पण त्याकाळी देखील रोजा ठेवला जात असे व्रत केल...

गुजरात राज्यातून ९०० मजूर परतले

Image
प्रतिनिधी तळोदा   गुजरात राज्यातील तब्बल ९०० ऊस तोडमजूर मढि जिल्हा तापी इथून काही खाजगी टेंपोने गुजरात राज्याची सीमा ओलांडून निझर मार्गे महाराष्ट्र्रात दाखल झाले असून सदर मजूर  प्रकाशा इथं पोहचणार असल्याचे जिल्हा प्रशासन ला कळल्या नंतर तात्काळ प्रशासन च्या हालचाली गतिमान झाल्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली, तसेच त्यांना  शहादा इथं न नेता सरळ तळोदा तालुक्यातील आमलाड विलगिकरण कक्ष कडे नेण्यात आले या ठिकाणी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडण्यात आले, दरवर्षी गुजरात राज्यात ऊसतोडणी साठी सह कुटुंब  हजारो मजूर नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतरित होत असतात, यंदा देखील असेच शहादा तालुक्यातील व तोरणमाळ भागातील मजूर गुजरात राज्यात गेले होते, मात्र गुजरात राज्याने त्यांना महाराष्ट्रात परत जाण्यासाठी त्यांना  गुजरात  राज्याने उन्हा तान्हात कोणतेही सोय न करता पाठविले आहे , शहादा तालुक्यातील सिंध दिगर,तोरणमाळ, कुंडी पाळा , खडकी , झापी फलाई  कुंड्या भाद्दल ,जुना व नवा तोरणमाळ या भागातील बहुसंख्य मजूर आहेत ,   गुजरात राज्यसरकार ने इतका मोठ...
Image
साहेब तू देव माहू हाय कालीचरण सुर्यवंशी तळोदा प्रतिनिधी सम्पूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे त्यात भारत आणि महाराष्ट्र देखील सुटले नाही आपल्या जिह्यातील कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात राज्यात जात असतात ह्या वर्षी देखील कामासाठी गेलेत परंतु कोरोना या महामारीने कामगारावरती महासंकट उभे केले अशात गुजरात राज्याच्या विविध ठिकाना हुन हे मजूर काही किलोमीटर तासनतास पायी चालत महाराष्ट्र सीमे लगत अंबाबारी धारणाजवळ एकत्र आले जवळपास हजार ते बाराशे मजूर अंबाबारी गावाजवळ आले असता स्थानिक लोकांनी त्यांची नास्ता व चहापाण्याची वेवस्था केली.      स्थानिक लोकांनीच शहादा तळोदा चे आमदार राजेश पाडवी यांच्याशी सम्पर्क करून सर्व माहिती दिली. आमदार राजेश पाडवी यांनी सम्पूर्ण माहिती घेऊन मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ढपंर,आयशर,पिकप अश्या गाडीची वेवस्था  स्वखर्चाने केली.      पायी चालत आलेल्या मजुरांचे पाय सुजलेले होते तर काहीच्या पायाला फोड आलेले दिसून आले महिलांन सोबत लहान मुलं देखील होते.      आमदार राजेश पाडवी यांनी सर्व माहीती ...

गुजरात राज्यातून ९०० मजूर परतले

Image
प्रतिनिधी तळोदा   गुजरात राज्यातील तब्बल ९०० ऊस तोडमजूर मढि जिल्हा तापी इथून काही खाजगी टेंपोने गुजरात राज्याची सीमा ओलांडून निझर मार्गे महाराष्ट्र्रात दाखल झाले असून सदर मजूर  प्रकाशा इथं पोहचणार असल्याचे जिल्हा प्रशासन ला कळल्या नंतर तात्काळ प्रशासन च्या हालचाली गतिमान झाल्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली, तसेच त्यांना  शहादा इथं न नेता सरळ तळोदा तालुक्यातील आमलाड विलगिकरण कक्ष कडे नेण्यात आले या ठिकाणी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडण्यात आले, दरवर्षी गुजरात राज्यात ऊसतोडणी साठी सह कुटुंब  हजारो मजूर नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतरित होत असतात, यंदा देखील असेच शहादा तालुक्यातील व तोरणमाळ भागातील मजूर गुजरात राज्यात गेले होते, मात्र गुजरात राज्याने त्यांना महाराष्ट्रात परत जाण्यासाठी त्यांना  गुजरात  राज्याने उन्हा तान्हात कोणतेही सोय न करता पाठविले आहे , शहादा तालुक्यातील सिंध दिगर,तोरणमाळ, कुंडी पाळा , खडकी , झापी फलाई  कुंड्या भाद्दल ,जुना व नवा तोरणमाळ या भागातील बहुसंख्य मजूर आहेत ,   गुजरात राज्यसरकार ने इतका मोठ...

संपर्क साखळीतील व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीवर भर देणे गरजेचे,,,,,, खासदार डॉ हिना गावीत

Image
संपर्क साखळीतील व्यक्तींच्या वैद्यकीय तपाणीवर भर द्या-खासदार हिना गावीत प्रतिनिधी  तळोदा : कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून जास्त जोखिमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात यावेत, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. श्रीमती गावीत म्हणाल्या, राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी. बाहेरील जिल्ह्यातील नागरीक येणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात यावीत. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतने गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करावी,  असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड य...

बुद्ध पौर्णिमेच्या होणारी प्राणी गणना कोविड १९ मुळे रद्द

Image
सुनील सुर्यवंशी प्रतिनिधी तळोदा  राज्यात बुद्ध पौर्णिमा निमित्ताने होणारी प्राणी गणना यंदा  कोविड १९ मूळ रद्द  करण्याचा आदेश विभागीय वन अधिकारी यांच्या कडून काढण्यात आले आहेत,  दरवर्षी बुद्ध पौर्णिमा काळात निसर्ग अनुभव घेण्यासाठी  मुंबई, पुणे, अहमदाबाद, बडोदा, सारख्या प्रमुख शहरातून वन्य जीव प्रेमी फोटोग्राफी अथवा निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करण्यासाठी व अनुभव घेण्यासाठी पानथळ  जवळपास मचाण तयार करून प्राणी गणना काळात हजेरी लावतात, या वेळी एक वनकर्मचारी सोबत  शहरातून अथवा बाहेर गावाहून आलेले वन्यप्रेमी उपस्थित असतात यंदा कोविड १९  मूळ त्याच पालन होणे  शक्य नसल्याने  बुद्ध पौर्णिमा निमित्त होणारी प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे बोद्ध पोर्णिमा निमित्त होणारी गणना रद्द -      राज्यातील प्रत्येक व्याघ प्रकल्प राष्ट्रीय उद्यान व अभयअरण्य व त्यांच लगतच्या क्षेत्रात या वर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांचे पांनवठावरील  अस्तित्व सनियंत्रण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे प्रधानंमुख्य वन संरक्षक महाराष्ट यांचा कडून देण्यात आ...

मरी जायजो कोरोना,,,,,,,,

Image
कालीचरण सुर्यवंशी.. तळोदा:-   ये ,,,इधर.….. इधर,.. इधर..... जिंदगी को दाव पे लगाती  लडकीया.... देखीये,चलो.... शो चालू और जल्द ही शूरु होने वाला है....... मौत का कुवा..... मौत का कुवा               असा कानठल्या बसणारा आवाज आणि त्यातच मध्ये हिंदी चित्रपट मधील गाणं.....                     अशी तळोद्याची प्रसिद्ध यात्रा दरवर्षी  उत्साहात भरायची,यंदा मात्र कोरोनामुळे यात्रेच्या ठिकाणी निरव शांतता पसरली आहे......कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी तळोद्याची यात्राच रद्द करण्यात आल्याने उत्साह व आनंदावर विरजण पडले आहे..                     परीक्षा संपल्यानंतर व सुट्टी लागल्यावर तळोदा शहरातील व तालुक्यातील मुलांचे मुख्य आकर्षण म्हणजे तळोद्याची यात्रा. वर्षंभर काही वस्तू भले भेटतील पण तरी जी यात्रेत फिरून आई वडिलांजवळ हट्ट धरून ती वस्तू घ्यायला भाग पडण्याची हक्काची जागा म्हणजे यात्रा.तलोद्याच्या यात्रेत सर्व...

त्या चार जणांचा नेगेटिव्ह अहवालाने तात्पुरते संकट तळले असले तरी

Image
तळोदा:- अक्कलकुवा येथील महिलेच्या व तिच्या पतीच्या प्राथमिक सपर्कात आलेल्या चारही व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले  असल्याने तळोदेकर व प्रशासनाने  सुटकेचा श्वास सोडला आहे.  असे  असले तरी येणाऱ्या काळात अधिक सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या असून पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.                              अक्कलकुवा येथे निवास असणारे शिक्षक दांपत्य तळोदा शहरातील एका जी,प, शाळेत असून लॉक डाऊन काळात शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचे आदेशा नंतर मालेगांव येथून 17 एप्रिल रोजी तळोदा येथे शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटपसाठी तलोद्यात पती शिक्षक उपस्थित होते, त्याच्या हस्ते 87 विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते.                21 रोजी कोरोनाच्या लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त होताच मध्यरात्रीच तहसीलदार पंकज लोखंडे, सहाय्यक आरोग्य जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक...

त्या चार जणांचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर शहरवासी व प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास-

Image
तळोदा-(सुधाकर मराठे) अक्कलकुवा येथील महिलेच्या व तिच्या पतीच्या प्राथमिक सपर्कात आलेल्या चारही व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले  असल्याने तळोदेकर व प्रशासनाने  सुटकेचा श्वास सोडला आहे.  असे  असले तरी येणाऱ्या काळात अधिक सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या असून पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.                              अक्कलकुवा येथे निवास असणारे शिक्षक दांपत्य तळोदा शहरातील एका जी,प, शाळेत असून लॉक डाऊन काळात शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचे आदेशा नंतर मालेगांव येथून 17 एप्रिल रोजी तळोदा येथे शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटपसाठी तलोद्यात पती शिक्षक उपस्थित होते, त्याच्या हस्ते 87 विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते.                21 रोजी कोरोनाच्या लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त होताच मध्यरात्रीच तहसीलदार पंकज लोखंडे, सहाय्यक आरोग्य जिल्हाधिकारी डॉ.महेंद...

कोरोनामुळे केळीचे भाव वधारले

Image
 तळोदा:- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही कमी होत नसल्याने वाढवलेल्या ‘लॉकडाऊन’चा शेतीमालाला मोठा फटका बसत आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळी डोळ्यांदेखत फेकून देण्याच्या स्थितीत आल्याने केळी उत्पादकही अक्षरशः हतबल झाले आहेत. सध्या बाजारात मागणीच नसल्याने कोरोना आजार मुळे व व्यापारी कमी भाव मागत होते आता तर येतच नसल्याने झाडे वजनाने गळून पडत आहेत अनेकांनी केळी उखडून फेकून देण्याचा निर्णय घेतला आहे   काळजावर दगड ठेवून शेतकरी कवडीमोल भावात केळी विकण्यासाठी धडपड करीत आहेत. आतापर्यंत झालेला लाखो रूपयांचा खर्चही निघणे सोडा ते काढण्यासाठी मजुरी देखील परवडणार नाही अशी स्थिती आहे. गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यंदा पाण्याच्या मुबलकतेमुळे तालुक्यात हजारो  हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे. मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीसह आलेल्या विविध संकटांवर मात करून तळोदा तालुक्यातील   करण्यासाठी हजारो रुपये वर्षभरात रासायनिक खतांचे तीन डोस दिले. याशिवाय निंदणी, वखरणी असा एकूण चार ते पाच लाखांपर्यं...

लोकडाऊनच्या काळात शेतशिवारातील भारनियमन रद्द करा:- आमदार राजेश पाडवी

Image
 तळोदा - कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. परिणामी सर्वच उद्योग व्यवसाय बंद असताना अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकरी शेतात राबून आपले पिके वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. उद्योगधंदे कारखाने बंद असल्यांने विजेचा खप कमी आहे, त्या अनुषंगाने दिवसा विद्युत पुरवठा खंडीत करू नये अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.          वैश्विक महामारी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे, परिणामी जीवनावश्यक दुकाने वगळता, सर्वच उद्योग धंदे, कारखाने बंद आहेत. अश्या प्रतिकूल परिस्थितीत ही बळीराजा शेतात राबून पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहे.        मात्र महावितरणाकडून भारनियमनाचे कारणे पुढे करून दिवसाच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे.  बऱ्याचवेळा दिवसा व रात्री असा खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे कोरोना हे मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकरी या चिंतेत असताना विजेअभाव...

कोरोनामुळे बैल बाजार बंद, कोट्यावधीचे व्यवहार ठप्प

Image
प्रतिनिधी तळोदा - तळोदा येथे अक्षय तृतीया निमित्त कालिकामाता यात्रोत्सव सोबत  बैल बाजारासाठी प्रसिद्ध मानली जाते. मात्र मागील वर्षी कोट्यवधी ची उलाढाल होणाऱ्या हा बाजार यंदा भरणार नसल्याने कृषी  उत्पन्न बाजार समिती ला मोठा आर्थिक फटक बसणार आहेत,   तलोद्यात बैल बाजाराचे कोट्यवधींची उलाढाल होत असते. मागील वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने गुरांना पिण्याचा पाण्याची व चाऱ्याची समस्यां उदभवत असल्याने अनेकांनी आपले सर्जे राजे विक्रीस आणले होते मागील वर्षाप्रमाणे यंदा या बाजारात कोट्यवधीची उलाढाल झाली असती असे अंदाज होते मात्र कोरोना आजार मूळ यंदा हा व्यवहार ठप्प होणार झाला आहे . तळोदा बाजार समितीच्यावतीने मार्केट यार्डात  दरवर्षी यात्रा भरवण्यात येते  या बाजारात गुजरात, महाराष्ट्र्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, सोबतच सातपुडय़ाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातील बैलांसह  धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावठी व ठेलारी प्रजातीच्या बैल याठिकाणी विक्रीस मोठी मागणी असते,  बैलबाजारानिमित्त इतर पूरक व्यावसायिकांनीही याठिकाणी हजेरी लावतात, . तर याठिक...

तळोदा येथे भाजीपाला विक्रेत्यांसाठी आठ जागा निश्‍चित

Image
‘त्या’ जागेवर तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन* तळोदा: शहरातील विद्यानगरी, जोशी नगर प्रल्हाद नगर, गणपती मंदिर आनंद चौक, खर्डी नदी (यात्रेचा जागी) विमल नगर, प्रताप नगर अशा आठ जागा भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी तात्काळ त्या जागेवर स्थलांतरित व्हावे. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी भाजीपाला विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व विक्रेत्यांनी मास्कच्या वापराशिवाय भाजीपाला विक्री करू नये. तसेच नागरिकांनी त्यांच्याजवळील भाजीपाला विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करावा. उगाच इतरत्र ठिकाणी भाजीपाला घेण्यास गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.                कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वा.सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा भाग तळोदा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला तहसीलदार पंकज लोखंडे, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. नागरिकां...

तळोदा प्रशासन प्रतिबंधकात्मक क्षेत्र साठी सज्ज

Image
तळोदा:- राज्यशासनाने जारी केलेल्या आदी सुचने नुसार तळोदा येथे शिथिलता देण्याबाबत व कोरोना साथजन्य आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत उपविभागीय कार्यालय येथे खातेप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. पूर्व उपाययोजना म्हणून वार्ड निहाय प्रतिबंधात्मक क्षेत्र विभाजून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमण्यात आले.           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनसाठी राज्यात जारी केलेला नवीन अधिसूचने नुसार शहर शिथिल करण्याबाबत व भविष्याच्या उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून, खातेप्रमुखांची आढावा बैठक प्रांताधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात पार पडली. यावेळी तहसीलदार पंकज लोखंडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, सहाय्यक गटविकास अधिकारी, आर.बी.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी आदी उपस्थित होते.             दरम्...

पवित्र रमजानच्या महिन्यात संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

 तळोदा:-दि.19-  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत शासनाच्या विलगीकरण पालन करण्याच्या सुचनांचे आणि संचारबंदीच्या नियमांचे पालन पवित्र रमजानच्या महिन्यातदेखील कटाक्षाने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या छतावर, मोकळ्या मैदानावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सुचनांचे पालन करण्यात यावे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 आणि भारतीय दंड संहितेमधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (जिमाका नंदुरबार)

आणि बळीराजा सुखावला,,,,

Image
…… अन् श्रमाचे चीज झाले! प्रतिनिधी तळोदा शहादा आडत व्यापारीपेठेचा परिसर ट्रॅक्टरच्या आवाजाने रात्री 9 च्या सुमारास तिथली शांतता भंग केली…..बाजार समितीतील शांतता  शेतकऱ्याच्या चिंतेत भर घालणारी….ट्रॅक्टरमध्ये कष्टाने पीकवीलेली कोबी भरलेली…..तीन दिवस बाजार बंद म्हटल्यावर शेतमाल फेकणे किंवा मोफत देणे असे दोनच पर्याय…. अचानक एक व्यक्ती भेटते आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर दिसू लागते…. ….शहादा  येथे हा शनिवारी रात्री घडलेला प्रसंग. मालपूरचे शेतकरी  पांडुरंग माळी हे ट्रॅक्टरमध्ये  दोन ते अडीच हजार गड्डा कोबी घेऊन रात्री 9 च्या सुमारास आले. बाजारातील  शांतता पाहून मनात चिंता निर्माण होणे स्वाभाविकच होते. अशात एकाने 3 दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याचे सांगितले. अर्थ स्पष्ट होता, नुकसान सहन करावे लागणार होते. माळी यांच्या शेतात कांदा, मका, पपई लागवड केलेली आहे. लॉकडाऊनच्या स्थितीत शेतमाल विकण्याची चिंता आधीच होती आणि त्यात बाजार समिती बंद असल्याने भर पडली. आडत दुकानदार असलेल्या राजेंद्र पाटील यांना शेतऱ्याची अवस्था जाणली आणि किमान त्याचा खर्च वसू...

डॉ वाणींच्या प्रयत्नातून जळगावला अडकलेल्या विद्यार्थिनांना जीवनावश्यक वस्तू

Image
  तळोदा : शिक्षणासाठी जळगांव येथे असणाऱ्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थींना भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी यांच्या प्रयत्नातून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आले.      लॉकडाऊनमुळे शिक्षणासाठी जळगांव येथे राहत असणाऱ्या तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ,धडगाव तालुक्यातील मनवानी व अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथिल तीन विद्यार्थिनीं अडकून पडल्या होत्या.त्यांच्याकडील समिधा व पैसे संपल्यावर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या विद्यार्थिनींनी मदतीसाठी शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क केला. ही बाब आमदार पाडवी यांनी डॉ वाणी यांना कळवून या विद्यार्थिनींची व्यवस्था करण्याचे सांगितले.        डॉ वाणी यांनी ह्या बाबत भाजपचे संघटन मंत्री किशोरजी काळकर यांना सविस्तर माहिती दिली.त्यानंतर जळगांवचे आमदार राजूमामा भोळे यांनी या विद्यार्थिनींना महिनाभर पुरेल एवढा किराणा उपलब्ध करून दिला.त्यात गहू,तांदूळ,दाळ,साखर,तेल, मसाला इत्यादी वस्तूंचा समावेश होता.           कोरोनामुळे ज...

व्यापाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने तळोदा शहर दोन दिवस बंद

Image
तळोदा:- नंदुरबार येथे एका जणांचा कोविड 19 चा अहवाल पोसीटीव्ह आल्यानंतर प्रशासनासह जनता ही सज्ज झाली आहे. तालुक्यात सतर्कता म्हणून आवश्यक ते उपाययोजना केले जात आहेत. .         शनिवारी सायंकाळी तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या कार्यालायात, नगराध्यक्ष अजय परदेशी, उप पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असणाऱ्या किराणा दुकानदार, फळभाजी विक्रेते यासह इतर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने 2 दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान अत्यावश्य सेवा म्हणून गरजेचे असलेले मेडिकल व दवाखाने व दुध विक्रेते यातून वगळण्यात यावे असे एकमत करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी  लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.  नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन तहस...

मोफत धान्य वाटपाचे श्रेय लाटू नये; आमदार राजेश पाडवी

Image
तळोदा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च पासून संपूर्ण  भारत देश लोकडाऊन केला आहे या अनुषंगाने देशातील गोरगरीबांची  उपासमार होऊ नये म्हणून केंद्र शासनाने एप्रिल ते जून तीन महिन्या करिता ५ किलो तांदूळ प्रति व्यक्ती धान्य वितरणास सुरुवात केली आहे               माहे एप्रिल महिन्याचे विनामूल्य  तांदूळ वाटप अंतोदय व प्राधान्य कुटुंबास धान्य वाटप सुरू केले आहे बऱ्याच खेडे गावात काही स्थानिक पुढारी  ग्रामस्थांची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा प्रयन्त करीत आहे  ही योजना केंद शासनाची असून कोणत्याही स्थानिक राजकारणाचा भुलथापांना बडी पडू नये असे  एका निवेदनाद्वारे शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी जनतेला सूचित केले आहे. सुदैवाने नंदुरबार जिल्ह्यात आपण सर्व्यांनी सोशलडीस्टन योग्य ते पालन करून मास्क चा वापर करून केंद्र व राज्य शासनाचा दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ दिला नाही. आपणास या परिपत्रकाद्वारे विनंती करण्यात येते की अशीच दक्षता घेऊन पंतप्रधान नरेंद मोदी तसेच मुख्यमंत्री ...

धनपूर येथे डेंग्यू सदृश रुग्ण सापडला; प्रशासन सज्ज

Image
तळोदा: (सुधाकर मराठे)तालुक्यातील धनपूर येथील 28 वर्षीय युवक डेंग्यू सदृश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत मार्फत सतर्कता बाळगण्यात आली असून गावात धुरळणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत असून गावातून 10 रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.            धनपूर येथील 28 वर्षीय युवकास गेल्या चार पाच दिवसांपासून थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसू लागल्याने त्याला प्रतापपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखविण्यात आले. दरम्यान याठिकाणी विविध तपासण्या केल्यानंतर तो युवक डेंग्यू सदृश असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान धनपूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग विभागा सतर्क आहे, अपुरे मनुष्यबळ असले तरी देवदूत ठरलेल्या आरोग्य सेवेकऱ्यासमोर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तालुका आरोग्य विभागाकडून धनपूर गावात जलद ताप सर्वे...

जिल्ह्यात कोरोनाची दस्तक; प्रशासन सज्ज

Image
नंदुरबार शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांनी घाबरू नये, घरातच राहावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड नंदुरबार शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक 10 भागातील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाच्या एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. नंदुरबार शहरातदेखील संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वॉरंटाईन केले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.

तळोदा शहरातील 5 हजार विद्यार्थ्यांना मिळणार शालेय पोषण आहार

Image
तळोदा:(सुधाकर मराठे) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ शहरी भागातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषस शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय यांचा समावेश असून तळोदा शहरात जिल्हा परिषद व खाजगी अश्या 14 शाळा असून 5 विद्यार्थी शापोआ वितरीत होणार आहे.           कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा साथ रोग कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली तरतुदी नुसार सक्षम प्रधिकरण यांच्या मान्यतेने व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात दिनांक ३ मे पर्यन्त संपूर्ण देशात लोकडाउन असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व लहान बालके पोषण आहार पासून वंचित राहत असल्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुमुटो रिट याचिका दाखल झांल्यानंतर त्या दृष्टीने लहान बालके व विद्यार्थी यांना पोषण आहार देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शहरी भ...

माजी आमदारांनी स्वतःचे हॉटेल प्रशासन साठी केले खुले

Image
तळोदा:- कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, स्थलांतरीत अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी शिरीष चौधरी यांनी हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथील 50 रुम्सची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संदर्भातील सहमती पत्र जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना दिले.               श्री.चौधरी यांनी  यापूर्वी अमळनेर येथील त्यांचे निवासस्थान होमक्वारंटाईन व्यक्तींसाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भेाजनाची सेवा करण्याचीदेखील त्यांनी तयारी दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धन्यवाद देताना जिल्ह्यात विविध स्तरातून प्रशासनाला मिळत असलेल्या सहयोगाबाबत समाधान व्यक्त केले. कोविड-19 संदर्भातील उपाययोजना करताना आपण प्रशासनासोबत असल्याचे श्री.चौधरी यांनी यावेळी सांगितले. पीएम केअर निधीला 25 हजार रुपये श्री.गजानन फायबर प्रा.लि. कडून पीएम केअर निधीसाठी 25 हजाराचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिरीष चौधरी, अशोककुमार व...

छुपे मार्गावर पोलीस नेमण्याची मागणी

Image
तळोदा:- तालुका हा गुजरातराज्याच्या सीमा लगत असल्याने शेजारील असलेल्या दोघे राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही राज्यात दळन -वळण करण्यासाठी अनेक छुपे मार्ग आहेत. तसेच रात्री बेरात्री दुचाकीस्वार आणि पायी येणाऱ्यांची संख्या या दोन राज्यांना जोडणाऱ्या मार्गाने आहे. तालुक्याच्या ग्रामपंचायतीन्नी स्वयंसेवकांची निवड केली आहे. दरम्यान गावात बाहेरून येणाऱ्याना देखील परवानगी नाकारली जात आहे. मात्र अनेकजण आजही छुप्या मार्गाने गावात दाखल होत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून छुपे मार्ग पूर्णत बंद करावे यासाठी काही महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करावेत अशी अपेक्षा व मागणी प.स सभापती यशवंत ठाकरे व उपसभापती लताबाई वळवी यांचे पती अर्जुन वळवी यांनी केली आहे.            खापरच्या सीमारेषेवरील गुजरातच्या डेडियापाडा तालुक्यात सेलांबा येथील एक व नर्मदा तालुक्यातील 3 जन कोरोनाबाधीत  असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच शेजारील मध्यप्रदेश सिमेलगत असलेला सेंधवा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. गावागावत ग्रामद...

घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या ’खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना

Image
तळोदा:- लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय? हा प्रश्न जास्त कठीण होता. तसा आमचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्हाला थांबविण्यात आल्यानंतर मोठी समस्या समोर आल्यासारखे वाटले, पण इथे घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या आणि माणसांची वागणूक चांगली असल्याने घरापासून असलेला दुरावाही सुसह्य झाला..... ....बंगळूरू येथून राजस्थानकडे निघालेल्या एका कामगाराची ही प्रतिक्रीया राज्य शासन आणि नंदुरबारच्या प्रशासन करीत असलेल्या मदतकार्यातील संवेदनशिलता स्पष्ट करणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात येथून आलेल्या इतरही नागरिकांच्या प्रतिक्रीया अशाच आहेत. परप्रांतातील 116 व्यक्तींची खापर येथील केंद्रात  निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. कोविड 19 च्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जरी जिल्हाबंदी करण्यात आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांची जिल्ह्यात चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्य...

प्लेग नंतर कोरोनामुळे कालिका यात्रेत खंड

Image
तळोदा:- तळोदा शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे 225 वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारनी सुरू केलेली  कालिकादेवीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.याबाबत पत्र काढून काढून पालिकेने नागरिकांना व व्यापाऱ्यांना सूचना दिली आहे.                        तळोदा शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे 225 वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारनी कालिका मातेच्या मंदिराची उभारणी केली होती.तेव्हापासून तळोदा शहरात कालिका मातेचा यात्रोत्सव भरविण्यात येतो.त्या काळातील खान्देशातील ही वर्षातील शेवटची यात्रा असायची.                            जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि १३ मार्चपासून लागू आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून फौजदारी  प्रक्रिया १९७३ नुसार मनाई आदेश लागू केले असल्याने यावर्षी यात्रोत्सव भरवता येणार नाही,असे पालिकेकडून नागरीक व व्यापारासाठी काढण्यात आलेल्या सुचनेत नमूद केले आहे. यावर्षी यात्रा रद्द झाल्याने त्यांचा व्यावसायिक,व्यापारी यांना मोठया आर्थिक फ...

महाराष्ट्राचा सीमेवर कोरोना प्रशासन सतर्क

Image
तळोदा:- महाराष्ट्र्र हद्दीला लागून असलेल्या गुजरात राज्यातील शेलांबा गावात एक  वयस्क नागरिकांस कोरोना  संक्रमण आढळून आले असल्याने गुजरात सीमेवर असणाऱ्या अक्कलकुवा व खापर गावात खबरदारी  घेतली जात आहे, तर खापर गावात देखील सतर्कता बाळगली जात आहे.                 महाराष्ट्र राज्याच्या लागून असलेल्या नर्मदा जिल्हात दोन रुग्ण आढळले असून आता महाराष्ट्र गुजरात राज्याचा सीमेवर असणारे सेलांबा हे गाव गुजरात राज्यात असले तरी अवघे १३ की,मी, खापर गाव पासून असल्याने या ठिकाणी नियमित पणे विविध कारणाने लोक ये जा करत असतात शेलांबा हे व्यपारी दृष्टीकोनातून सीमेवरील एक मोठं केंद्र समजलं जातं त्यामुळे खापर इथून अनेक छोटे मोठे व्यपारी ये जा करत असतात , त्यामुळे आता खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क झालं असून  तपासणी नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त असला आहे व आरोग्य यंत्रणा देखील सतर्कता बाळगत आहे,             दरम्यान  यापूर्वी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा या ठिकाणी कोरोना रुग्ण आढ...