तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून गुण गौरव
तळोदा
दहावी सीबीएससी पॅटर्न व बारावी एच एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या तळोदा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून अभिनंदन पत्रे देण्यात आली. ही अभिनंदन पत्रे विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या अनोख्या शुभेच्छांनी विद्यार्थी भारावले होते व पुढील शैक्षणिक आयुष्यातही शहराचे नाव उज्ज्वल करण्याच्या प्रयत्न करणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकांनी उपक्रमाचे स्वागत केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी , उपाध्यक्ष विकास राणे ,सचिव किरण पाटील ,कोषाध्यक्ष सुशील सुर्यवंशी जेष्ठ पत्रकार भरत भामरे, व सदस्य उपस्थित होते.
all the best sir and lot of thanks
ReplyDelete