ब्रिटिश कालीन १८६७ पासून चे पालिका कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार
ब्रिटिश कालीन १८६७ पासून चे पालिका कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार
तळोदा: /सुनिल सूर्यवंशी
- दीडशे वर्ष जुनी व खान्देशातील सर्वात जुनी पालिका असणाऱ्या तळोदा पालिका आता नवीन वास्तुत स्थलांतरित होत असून नवीन वर्षात मार्च पावेतो तळोदा पालिका सर्व प्रमुख विभाग आता प्रशस्त अश्या वेगवेगळ्या ठिकाणी असतील ,
ऐतिहासिक तळोदा पालिका -
तळोदा पालिका हि इंग्रजांचा काळापासून १८६७ सालापासून तळोदा शहरातील मध्यत्वर्ती भाग स्मारक चोक परिसरात असणाऱ्या जोहरी समाजाचा धार्मिक स्थळ भागात भाडेतत्वांवर आहे , मात्र या ठिकाणी अतिशय अरुंद जागेत इतके वर्ष पालिका कामकाज सुरु होते , विकासाचा दृष्टीने जरी इतर पालिकेचा तुलनेत तळोदा शहर मागं असलं तरी खदेशातील सर्वात जुनी पालिका म्हणून तळोदा पालिका ओळखली जाते ,या ठिकाणी मुख्याधिकारी यांचं छोटंसं दालन आहे तसेच नगराध्यक्ष दालन ,बांधकाम विभागच मोडकळीस आलेली खोली, स्वच्छता विभाग ,जन्म मृत्यू, असे विभाग अतिशय अरुंद जागेत कोणत्याही सुविधा नसतांना सुरु आहेत, यामुळं कर्मचारी व प्रशासनास मोठी अडचण निर्माण होते,
दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरते आता मात्र नवीन इमारतीत सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज अशी पालिका च काम अंतिम टप्प्यात असून सदर नूतन वास्तू हि मटन मार्केट चा समोर असून दुमजली असणाऱ्या या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर नवीन पालिका स्थलांतरित होणार आहे ,याचा शेजारीच पालिकेचे नवीन दोन व्यपारी संकुल देखील तयार झाले आहेत,
आता मात्र नागरिकांना सोय होणार आहे,
नवीन आधुनिक सभागृह -
नवीन स्थलांतरित होणाऱ्या पालिकेत सर्वात महत्वाचं सभागृह अतिशय भव्य असणार आहे यात पालिकेतील लोकप्रतिनिधी नगरसेवक यांना दरवेळी होणाऱ्या जागेची अडचण पाहता आधुनिक सभागृहात सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत,
खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका-
तळोदा न.पा.ला मानले जाते.
या पालिकेची स्थापना सन १८६७ साली झाली. त्यावेळी पालिकेचा कारभार एकाच खोलित चालत होता. आता मोठा विस्तार झाला आहे. तळोदा पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष गोविंद दिनूराम राठोड हे होते. आतापर्यंत २३ नगरअध्यक्ष या जीर्ण वास्तूच्या ठिकाणी झाले आहेत आता विद्यमान नगराध्यक्ष अजय परदेशी आहेत
तळोदा पालिका लवकरच नूतन वास्तुत जाणार असून या बाबत काम अंतिम टप्यात सुरु असून आधुनिक सोयी नि सज्ज असणाऱ्या नवीन वास्तुत पालिका स्थलांतरित झाल्याने कर्मचारी व पालिका प्रशासन यांना सोयी उपलब्ध झाल्याने नागरिकांचे काम देखील वेगाने सुटण्यास मदत होईल,
अजय परदेशी लोकनियुक्त
नगराध्यक्ष तळोदा नगर पालिका तळोदा
चॉकट -
दरम्यान या भागातील व्यापारी संकुलाचा भूमीपूजन माजी नगराध्यक्षा हेमलता डामरे यांच्या कार्यकाळात झाल, तर काँग्रेस च्या माजी नगराध्यक्षा रत्ना सुभाष चोधरी यांच्या काळात नवीन पालिका इमारत व सभागृहाच काम हाती
घेन्याय आले मात्र काही तांत्रिक कारणामुळे काम वेळेवर पूर्ण झाल नाही आता मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा काळात कामास गती मिळाली असून लवकरचं पालिका नवीन जागेवर स्थलांतरित होणार आहे
तळोदा पालिकेचे स्थलांतर टप्पा टप्पात होत असून आता रेकॉर्ड रूम तिथं स्थलांतरित होत असून वीज फिटिंग झाली की नंतर पालिका स्थलांतरित होईल
सपना वसावा
Comments
Post a Comment