भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी
डॉ शशिकांत वाणीची निवड
: नंदूरबार जिल्हा भाजपाचे जेष्ठ नेते डॉ शशिकांत वाणी यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली आहे.
भाजपाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात तळोदा येथिल भाजपाचे जेष्ठ नेते डॉ शशिकांत वाणी यांची सलग तिसऱ्यादा प्रदेश कार्यकारणीवर निवड करण्यात आली आहे.भाजपाच्या संघटनात्मक वाढ व विस्तारात त्यांचा हातखंडा असून उत्तर महाराष्ट्रात भाजपचे एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख आहे.तालुकाध्यक्षपदापासून नंदूरबार जिल्हाध्यक्ष ते प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून कामकाजचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.पक्षाने तिसऱ्यांदा प्रदेश कार्यकारणीत समावेश करून माझ्याप्रति व्यक्त केलेला विश्वास व जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेल,असे त्यांनी बोलतांना सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल राजकीय,सामाजिक व शैक्षणिक अश्या सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment