मैत्रीचे वृक्षरोपण

 बडे मियाँ छोटे मिया यांचे एकत्रित वृक्षारोपण,,,,,,,
     
राजकारणात कोणी कायमचा शत्रू तर कोणीही कायम मित्र नसतो,असे म्हटले जाते. तळोद्यातील  राजकारणाची वाटचाल देखील काहीशी अशीच  राहिलेली मागील काळात  तळोदेकर जनतेला अनुभवास आली आहे. तळोदा नगर पालिकेचा निवडणुकी पासून वैचारिक मतभेद,गैरसमज व   समनव्याचा अभाव यांमुळे एकमेकांपासून काही काळ लांब लांब असणारे महाराष्ट्र भाजपाचे  वजनदार जेष्ठ नेते डॉ.शशिकांत वाणी व तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी हे पुन्हा एकत्रित आल्याचे सुखद चित्र पहायचे मिळले. निमित्त होते ते अजयभैया परदेशी यांच्या वाढदिवसाचे.
           अजयभैया परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ शशिकांत वाणी यांच्याहस्ते अजय भैया यांनी वृक्षरोपण करून मैत्रीच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली असल्याचे दिसून आले.
तत्पूर्वी मागील वर्षी डॉ शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भ्रमणध्वनी वरून परदेशी यानी दिल्याची चर्चा होती, तरीही दुरावा होताच डॉ वाणी यांनी देखिल राजकीय प्रगल्भता व मुरब्बी अनुभवाचा प्रत्यय देत दुरावलेल्या जुन्या सहकारी मित्राला जवळ करत त्यांच्या कोठार येथिल शाळेत विशेष सत्कार घडवून आणत मनोमिलनाच्या पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जाते.
         पालिका निवडणुकीच्या काळात व त्यानंतर  तळोदा भाजप मधील अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली होती. गटबाजी वाढण्यासाठी  काही  प्रवृत्तीनी खतपाणी देखील उत्तम घातले होते.त्यातून ध, चा ,म होण्यास उशीर लागला नाही.पूर्वानुभव लक्षात घेता तलोद्यातील राजकारणात ध, चा म, करणारी काही प्रवृत्ती पटाईत आहे.त्याची फलश्रुती पालिका निवडणूक व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकाच्या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या विसंवादातून दिसून आली.
        त्यातच तळोदा शहरातील या भाजपच्या दोघे  नेत्यांमधील नाराजी व गैरसमज कशाप्रकारे दूर होतील  यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना तूर्तास तरी यश आल्याचे येत असून  त्यांच्यातील कटुता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.दोघे नेत्यांनी एकत्रित येऊन केलेल्या वृक्षरोपण व त्यानिमित्ताने केलेल्या मैत्रीचे रोपण पुढील काळात कस जपलं व जगवल जात या कडे देखिल साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.


 📝कालीचरण सूर्यवंशी✒️
9421887715
7057887715

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी