डॉ शशिकांत वाणी यांना संघटनेचे मोठं पद कधी मिळणार ?

  भाजपाची  प्रदेश  स्तरावर विभागीय, व संघटनेचे  महत्वाची पदा बाबत नुकतीच जबाबदारी देण्यात आली यांत नंदुरबार जिल्हातील जेष्ठ भाजप नेते तळोदा येथील डॉ शशिकांत वाणी  यांच्यावर कुठंतरी अन्याय झाल्याची भावना भाजपचे जिल्हातील एकनिष्ठ  कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी  यांच्यात दिसत आहे,

संघटन पातळीवर प्रामाणिक असणाऱ्या 
डॉ शशिकांत वाणी यांचा राजकीय प्रवास पहिला असता जिथं उमेदवार नसेल पक्ष अडचणीत असेल अश्या वेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली   तर काही वेळा लादण्यात आली मात्र ज्या वेळी त्यांनी उमेदवारी मागीतली व स्वतः उत्साह  व आत्मविश्वास दाखवून
लढायला तयारी केली त्या वेळी मात्र त्यांना उमेदवारी नाकारली असेही काही वेळा घडले आहे,

१९८० च्या दशकात नंदुरबार जिल्हा निर्मिती पूर्वी कोंग्रेस चा बोलबाला जिल्हात असतांना तळोदा व अक्कलकुवा भागात भाजप संघटन टिकून होत यात नागेश पाडवी,
माजी आमदार डॉ,नरेंद्र पाडवी, विद्यमान नगराध्यक्ष अजय परदेशी  सुरेश गुलाल माळी, यांचा सोबत प्रतापपूर सारख्या खेड्यातुन दररोज ये जा करत भाजप संघटना टिकवून ठेवण्यात त्यांचा देखील मोठा वाटा आहे,
  राज्यात व देशात सत्ता नसतानाही कमळाला तळ  हाताचा फोडा सारख जपून ठेवणारे म्हणून त्यांची ओळख  यावेळी मात्र आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या करिष्मा मूळ  केंद्रात व राज्यात सत्ता आल्यावर मात्र संघटन पातळीवर राज्यातील इतर भागासारखे दुसऱ्या पक्षाचे अनेकांनी कमळ हातात घेतले संघटन चा आवश्यकता नुसार ते आवश्यक देखील असेल मात्र यात जुन्या कार्यकर्ते वर कुठंतरी अन्याय झाल्याची भावना होती,
   जिल्हात देखील भाजपच्या नवीन कार्यकर्ते अधिक जोडले गेले असले तरी दुसऱ्या पक्षातून आयात झालेले व संघटन व पक्ष शिस्तीचे धडे न गिरवलेले गोंजारले गेले असल्याची ओरड तशी  मागील काळा पासून सुरूच आहे,
जुने व नवे असा एक उघड गटच पडलेला दिसून येतो,  या दोन्ही गटाशी जुळवून घेणे एक आव्हान होत मात्र वाणी यांनी ते  जुळवल  पक्ष पातळीवर त्यांना मागील काळात उत्तर महाराष्ट्र नोंदणी प्रमुख व लोकसभेचा वेळी धुळे लोकसभा प्रभारी  असे महत्वाचे पद दिलेत, मात्र एकूण त्यांचा  राजकीय प्रवास व अनुभव पाहता त्यांना
 प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सह सचिव,  असे कुठले तरी वजनदार पद अपेक्षित होते ते न मिळाल्याने त्यांनी या बाबत उघड पणे नाराजी व्यक्त केली नसली तरी
 गुरू पौर्णिमा निमित्ताने त्यांनी टाकलेली एक पोस्ट खूप काही सांगून जाते
" तुम्ही जे आतापर्यंत करत होते तेच पुन्हा कराल तर  तुम्हाला तेच मिळेल जे आता पर्यंत  मिळत होत आधी कधीच न मिळवलेलं मिळविण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल "

याचा राजकीय दृष्टीने वाचक म्हणून विचार केला असता गुरू पौर्णिमा निमित्ताने टाकलेला संदेश खूप काही सांगून जातो,
संयम हिच ताकद समजणाऱ्या  नव्हे तर त्याच मार्गाने चालणार अशी गुणगाठ  बांधणाऱ्या वाणी यांना वेळ प्रसंगी आक्रमक होणे , राजकीय कुटनीती खेळणे, धुमजाव करणे, वरिष्ठ नेत्यांना चिकटून राहणे असे हल्ली सुरू असणारे सर्वच राजकीय पक्ष मधील नवीन ट्रेंड त्यांना जुळवताना स्वभावाची क तत्वाची अडचण दिसून येते स्वतः ची पत्नी नगराध्यक्ष पदासाठी  अवघे अडीच वर्षे साठी पक्षा कडून उमेदवारी केली होती मात्र सांख्य बळ अभावी पराभव होणार हे निश्चित असूनही त्यांनी स्वतः च्या पक्षचा सदस्यांना आवश्यक ती खातीरदारी केली होती,
  हे उदाहरण तर ताजेच आहे,
तर विधान परिषद निवडणुकित स्वकीयांनी माघार साठी गळ घातली प्रलोभन दिल मात्र वाणी संघटन शिस्त
 (पार्टी लाईन) धरून त्यांनी पराभव स्वीकारला वास्तवीक त्यांची माघार पराभव पेक्षा योग्य निर्णय राहिला असता मात्र त्यांना पराभव पेक्षा माघार  मोठं अपयश वाटलं अशी विचारसरणी करणारे संघ निष्ठ आता कमी होतांना दिसत आहे हेच कटू सत्य आहे,
त्यामुळेच आज त्यांची अवस्था संघटने मध्ये सोडता येईना व पूर्ण धरता येईना अशी झाली आहे,
       शेवटी एकच कर्म करा फळाची अपेक्षा करू नका  हे वाक्य त्यांना लागू पडत नाही कारण उतार वयात फळाची अपेक्षा नाही करणार तर कधी करणार ?

1) प्रतापपुर पं.स.गणात पक्षाने वेळेवर A.B.form दिला नाही म्हणून अपक्ष निवडणूक लढवली.(पराभव)
2) तळोदा येथे वास्तव्य करून प्रतापपुर ग्रा.प.निवडणूक लढवली (विजयी)
3) मार्केट कमेटी 15 वर्षा पुर्वी (पराभव)
4) 2007 ला प्रभाग 1 मध्ये पत्नी चा पराभव
5) 2012 न.पा.निवडणूक पत्नी चा विजय 
6) 2015 D.D.C.C. बॅक निवडणूकीत पराभव
7) 2016 धुळे विधानपरिषदेची निवडणूकीत पराभव 
8) 2016 च्या खरेदी विक्री संघ निवडणूकीत पराभव




 आज अखेर त्यांचा एक काल परवाच एक ग्रुपवर आलेला मेसेज सध्याची राजकीय परिस्थिती साठी बोलका ठरतो
 सब्र करनेवालों का मुकदमा,
ईश्वर खुद लड़ता है...!


 कालीचरण सूर्यवंशी तळोदा✒️
९४२१८८७७१५ /७०५७८८७७१५

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी