सातपुड्याती दुर्मीळ टायगर गोम
प्रतिनिधी तळोदा
सातपुड्याच्या कुशीत आजही दुर्मिळ वन्य जीव दडून बसले असून असाच एक सहजपणे दृष्टीस न पडणारी indian tiger centipede
( टायगर गोम)
तळोदा ते धडगाव घाट रस्त्यावर आढळून आली आहे, हि प्रजाती अरावली पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा, या भागातच हा जीव आढळून येतो, हि प्रजाती वाघाचा अंगावर जसे पिवळे काळे पट्टे असतात तसे पट्टे या सरपटणाऱ्या जीव ला असल्याने यास टायगर सेंटिपेड अस नाव पडले आहे , हा जीव संधीपाद जीवात मोडला जातो या बाबत जेव विविधता चे जळगांव येथील वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा जीव सहज दृष्टीस पडत नाही, तर याची लांबी १० ते १८ से,मी, इतकी असू शकते प्राणिजीव अभ्यासक डॉ शशिकांत मगरे यांच्या अभ्यास नुसार हि प्रजाती सातपुड्याच्या गोर्यामाळ टेकडीवर आढळून येते हा जीव दुर्गम असुन सहज दृष्टीस पडत नाही,
Comments
Post a Comment