राजगृहावरील हल्ल्याचा तळोद्यात निषेध
आरोपींना अटक करण्यासह आंबेडकर कुटुंबियांना सुरक्षा देण्याची मागणी
कोठार : मुंबई येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह इमारतीवर  भ्याड हल्ला झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा तळोदा येथिल विविध संघटनांनी निषेध केला असून आरोपींना तत्काळ अटक करावी व आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
                याबाबत जयभिम नवयुवक मंडळ,ब्लु टायगर बॉईज व व लहुजी वस्ताद सोशल ग्रुप यांच्या वतीने तळोदा तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,७ जुलै रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथिल राजगृह या निवासस्थानावावर दोन अज्ञात व्यक्तीनी भ्याड हल्ला केला व निवासस्थान परिसराची नासधुस करुन घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या.या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या  जनतेत तीव्र संताप आहे.आरोपींना तत्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
       निवेदनावर  सुनिल खैरनार,अनिल पवार,नितीन गरुड,आनंद शिंदे,सुभाष शिंदे,हंसराज महाले,राकेश सावळे,सिध्दार्थ नरभवर,प्रविण नरभवर,मनोज खैरनार,ईकबाल अन्सारी,सुपियान बागवान,आकाश सोनवणे,शरद सावळे आदीच्या सह्या आहेत.

फोटो : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथिल राजगृह या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व आरोपीना अटक करण्याचे मागणीचे निवेदनात पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांना देतांना जयभिम नवयुवक मंडळ,ब्लु टायगर बॉईज व व लहुजी वस्ताद सोशल ग्रुप कार्यकर्ते...

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी