माझा आधारवड हरपला,,,, प्रतिभा ताई शिंदे
नाना साहेब जे. यू.ठाकरे यांचे आज कोरोना शी संघर्ष करता करता निधन झाले , लोकसंघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे यांच्या शब्दांतून संवेदना
माझा पुरोगामी चळवळीतील आधारवड आज हरवला
प्रतिभा शिंदे, लोक संघर्ष मोर्चा
१९८८ चे वर्ष साक्री येथे १४ व १५ फेब्रुवारीला बाबा आमटे नी काढलेली पहिली भारत जोडो यात्रा साक्रिला ला येणार त्या वेळी पहिल्यांदा नाना साहेबांची ओळख झाली , नानांच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये मी शिकत होती आणि शाळेत भरवल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवर मी जायचे नानांनी भारत जोडो यात्रेची तयार करण्याचे साठी आख्या साक्री तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये आम्हाला सायकलवर पाठवले प्रत्येक गावातून पापड,कुरडया ,धान्य गोळा करण्याचे काम व १४ ला सकाळी प्रत्येकाच्या घरावर गुढी अंगणा समोर रांगोळी काढण्याचे आवाहन करत आम्ही महिना भर फिरत होतो , १०विचे वर्ष घरच्यांचा पूर्ण राग नाना साहेबांवर १४ तारखेला बाबा व भारत जोडो यात्रा साक्री त आली आमचे आख्ख गाव गुढी ,रांगोळी ,फटाके अस सणा सारखं देखण सजल होत सर्वान मधे नव चेतना कोण तो उत्साह सायंकाळी महिला मेळावा त्यात मी युवती म्हणून भाषण केले व सांगितले की "हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही" पाहुण्यांनी स्वागत केलं पण मग माझ्या नातेवाइकांसह सर्वांनी शिव्यांची लाखोली वाहिली ती नाना साहेबांना त्यांनी तो राग मुकाट सहन केला मात्र माझे वडील व नानासाहेब दोघांनी कौतुकाची थाप त्या वेळी माझ्या पाठीवर मारली आणि माझं धाडस वाढले सकाळी भारत जोडो यात्रा नवापुरला निघून गेली आम्ही ८वाजता सकाळी शाळेत पोहचलो यात्रा गेली म्हटल्यावर मी स्वाती, भारती ,संगीता व गीता आम्ही घरात न सांगता नावापुरला निघून गेलो दहिवेल ला पोचल्यावर पैसे संपले तर नाकातील गोल रिंग विकून आम्ही नवापूरला पोचलो दहीवेल च्या सोनाराने नाना साहेबांना फोन करून सांगितले नाना साहेब आमच्या घरच्यांना निरोप देवून आम्हाला परत घ्यायला निघालेत तेव्हा ही सर्वांच्या घरी नाना कोण बोल ऐकावे लागले बापरे बाप, त्यांनी बाबांची आमची भेट घालून दिली व आम्ही दहावीत चांगल्या मार्कानी पास होवू व मग सोमनाथ ला शिबिराला येवू असे वचन घेतले.
नाना साहेबांनी १०वीच्या मधे छात्रभारती चे अभ्यास शिबिर घेतले आणि आम्हाला छात्रभारती जोडून दिले ,११वित पहिले "दलीत आदिवासी ग्रामीण साहित्य संभेलन " साक्री येथे घेतले ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे अध्यक्ष होते तर कॉ शरद पाटील यांच्या पासून तर अनेक लेखक ,कवी तिथे आले होते त्यात मी स्रि स्वातंत्र्या संदर्भात असलेल्या सत्रात भाषण केलं व मला घरून माझ्या कामाला पाठींबा च आहे असे मत व्यक्त केले तेव्हा कॉम्रेड शरद पाटील यांनी आमच्या सारख्या मुली स्रिय्या ज्या बाहेर पडून काम करतात त्यांना त्या पॅरोल वरचे कैदी आहेत असे उद्गार काढलेत आणि एकच गदारोळ उठला नानासाहेबांनी तेव्हा ही सर्वांना सांभाळून घेतले .
साक्री हुन दर रविवारी धुळ्याला सेवा दलाच्या साप्ताहिक शाखेत आणणे असो की कुठल्या शिबिरात, मोर्चात जाणे असो आमच्या घरी नाना आमचे वकील बनून जात.नानांमुळे यदुनाथ थत्ते , एस. एम .जोशी आण्णा ,ना.ग. गोरे , सुंदरलाल बहुगुणा, बाबा आमटे यांच्या पासून तर अनेक विचारवंत व पुरोगामी चळवळीचे नेते साक्रीला येऊन गेलेत त्यांच्या विचारांनी व प्रेरणेने आम्ही घडत गेलो.
मी पूर्णवेळ कार्यकर्ती होण्याचा निर्णय घेतला मामा, भाऊ यांना खूप राग पण नाना साहेब व माझे वडील माझ्या सोबत खंबीर पणे उभे राहिले ६जून १९९३ ला मला मनिबेली येथे पहिली जेल झाली तेव्हा औरंगाबाद च्या हरसुद जेल ला आणताना नाना धुळ्यात भेटायला आले कोण कौतुक व गर्व वर्णन शब्दात नाही सांगता येणार आम्ही तळोद्याला लोक संघर्ष मोर्चाचे काम सुरू केले नाना साहेबांनी १५ वर्ष मला १हजार रुपये महिना व अनेक पुस्तकं दिलीत
मला घडवण्या मधे नाना साहेबांचे फार मोठे योगदान आहे न्यू,इंग्लिश स्कूल म्हणजे पुरोगामी व परिवर्तन शील कार्यकर्ते घडवण्याचा अड्डा च म्हणावा लागेल . नाना आमदार झालेत तेही पोस्ट कार्ड वर निवडणूक लढत शिक्षक आमदार झालेत शाळेत नेहमी श्रमदाना ला महत्व दिले, भारत जोडो स्मृती वन असो की शिक्षकानं साठी कर्मवीर नगर असो की मुलानं साठी बाल नगरी त्यांनी आपल्या सहकाऱ्यान सोबत उभे केलेले हे पुरोगामी चळवळीचे साम्राज्य आहे.
नानांनी गावा गावात राष्ट्र सेवादल , छात्रभारती यांच्या शाखा उभ्या केल्यात. आंतरभारती व समाजवादी अध्यापक सभा यांचे काम घेवून ते महाराष्ट्र भर फिरत होते डिसेंबर मध्ये माझ्या कडे आलेत आणि मला सयाजीराव गायकवाड यांच्या भाषण व चरित्राचे खंड भेट देवून गेलेत. मी नानासाहेबांना पाहून म्हणाले नाना साहेब तुम्ही आमचे अनिल कपूर आहात ७४ वय कळत नाही तुमचे तर मनापासून हसले मी म्हणाले नाना आपण १०० पार करणार पण तेव्हा मी असेल का? तर किती रागवलेत म्हणाले जगण्याचा आशावाद आणि परिवर्तन होण्याचा आशावाद कधीच सोडायचा नाही त्या नानांनी कोरोना वर मात केली अस मी दहा दिवसांपूर्वी ऐकल आणि सर्वांना कोण अभिमानाने सांगत होते की नाना साहेब सर्व लढाया जिंकतात ही पण जिंकतील पण नाना तुम्ही आम्हाला धोका दिला ,माझा बाप २०१७ मधे गेलेत तेव्हा तुम्हा मला म्हणाले होते हा बाप नाही लवकर जाणार तू काळजी करू नको आणि असे मधेच सोडून गेलात खूप दुःख झाले नाना साहेब तुम्ही फक्त अजित,रणजित ला पोरके केले नाही तर मी, गजू, कैलास, स्वाती सुतार /अत्रे, विजू, भारती, संगीता(बंटी) ,सतीश अश्या असंख्य कार्यकर्त्यांना पोरके केले .
तुम्हाला श्रद्धांजली द्यायची म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीचे काम अखंड चालू ठेवायचे ते आम्ही सतत चालू ठेवू
लोक संघर्ष मोर्चा तर्फे भावपूर्ण आदरांजली
प्रतिभा शिंदे
लोक संघर्ष मोर्चा
Comments
Post a Comment