सोमावल इथं विविध कार्यक्रम

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमावल येथे विविध कार्यक्रम

२५० महिलांना साड्या वाटप व १०० वृक्षांची केली लागवड

           महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त आज दि.२२ जुलै बुधवार रोजी तळोदा तालुक्यातील सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
              वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सोमावल येथील फार्महाऊसवर शहादा-तळोदा विधनासभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडून शासनाच्या अटीशर्तीचे पालन करून सोशल डिस्टसिंग राखत २५० हून अधिक वृध्द, विधवा व निराधार महिलांना साडी व लुगडे यांचे वाटप करण्यात आले.

यासोबतच गावात विविध ठिकाणी कडूलिंबाच्या शंभराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश दादा पाडवी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, शहादा येथील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनील पाटील , पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत पाटील , तळोदा भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, स्वीय सहाय्यक वीरसिंग पाडवी नारायण ठाकरे, विठ्ठलराव बागले, किसन पाडवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी