*वृक्ष हेच व्हेंटिलेटर वृक्ष हेच जीवन,* मेधाताई पाटकर
शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे 'वृक्षदिंडी' काढून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात एका जागो रे भिला याने गाण्याने करण्यात आली. गावात रोपांचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य खरबाडे गावित व प्रा.बोराडे सर, नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधाताई पाटकर, लतिका राजपूत, खेमसिंग पावरा, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, माजी पंचायत समिती सभापती, शहादा डॉ.सुरेश नाईक, ईश्वर पाटील,फुले-आंबेडकर स्टडी सर्कलचे अनिल कुवर आदी उपस्थित होते.
चिखली पुर्नवसन वसाहतीच्या नागरिकांनी दिंडी काढून वृक्षारोपण कार्यक्रम केला. यावेळी मेधाताई पाटकर म्हणाल्या की, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. झाडं, जंगल हा आदिवासींच्या जगण्याचा व त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्यामुळे त्यांनी जंगलरक्षक दल बनवून आपल्या डाया डायांनी जंगल वाचवलं, सातपुड्यात रस्ते पोचले नव्हते, त्यामुळे बाजार नव्हते त्यावेळी जंगल टिकून होते. मात्र त्यानंतर काही प्रमाणात जंगल तोड झाली आहे. मात्र पुन्हा गावच्या माणसांनीच हे जंगल वाचवली आहेत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला झाडं दिली तीच आपण पुढच्या पिढीला देणार की नाही असा प्रश्न उपस्थित करून झाडे हीच व्हेंटिलेटर असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरसिंग पटले यांनी केले तर प्रस्तावना सुनिल पावरा यांनी केली.
Comments
Post a Comment