तळोदा
तालुक्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी महत्त्वाचे असणारे लघु प्रकल्प काही  अल्प प्रमाणात  भरत असले तरी त्याची गळतीही दरवर्षीप्रमाणे सुरू झाली असून 
येथील होणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी उन्हाळ्यात किरकोळ जलसाठा जेमतेम नावाला शिल्लक असतो या बाबत परिसरातील शेतकरी वर्ग कडून अनेकदा त्रकार करून देखील या कडे डोळेझाक होताना दिसत आहे,
 यात गढावली व रोझवा या दोन प्रकल्पांनी तर पावसाळ्या पूर्वीच तळ गाठल्याने कोरडे झाले होते,
 तर पाडळपूर येथे फक्त मान्सूनपूर्व 34 टक्के व  सिंगसपुर लघु प्रकल्‍पात 55 टक्‍के पाणीसाठा शिल्लक होता
. त्यामुळे या लघु प्रकल्पांच्या भिंतींना लागलेली गळती दुरुस्त होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यात तालुक्यात यंदा पाऊस अजूनही दमदार झालेला नाही , त्यामुळं येणाऱ्या काळात पाऊस कमी झाल्यास अडचण होऊ शकते ,
       तळोदा तालुक्यात कोणतेही मोठे धरण नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी फारशी पाणीटंचाई नाही. मागील वर्षी काही गावांना गाढवावर पाणी न्यावे लागले होते. तेथेही पाणी मिळण्यासाठी कामे मार्गी लागल्याने पाणीटंचाईची तक्रार अजून तरी नाही. झालीच तर काही ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई जाणवते.त्यावरही तोडगा काढला पाहिजे.
              त्यात शेत शिवारात सिंचनासाठी असणाऱ्या कूपनलिका अजून सुरळीत सुरू आहेत. मात्र तळोदा शहराच्या पश्चिमेकडील केवडी भागात पाण्याची पातळी खोल गेली आहे .तालुक्यातील मोड ,तळवे , बोरद परिसरातही पाण्याची भूगर्भ पातळी खोल गेली आहे.      
       त्यात तालुक्यात रोझवा ,गढावली ,पाडळपूर , सिंगसपुर व धनपूर येथील लघुप्रकल्पात पाणीसाठा होतो. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी हे लघुप्रकल्प महत्वाचे आहेत. त्यात धनपूर येथे  मागील वर्षापासून पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गढावली ,रोझवा ,पाडळपूर या लघु प्रकल्‍पाच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते. रोझवा व पाडळपूर येथील सांडव्याचा भीतीला मोठे खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी तडे गेल्याने साठलेल्या पाण्याची गळती होते.
       पाणीसाठा होऊन भरणाऱ्या या प्रकल्पात पाण्याची गळती होत असल्याने पूर्ण वर्षभर देखील पाणीसाठा टिकत नाही अशी अवस्था आहे. त्यात या लघुप्रकल्‍पात मातीचा थर अर्थात गाळ मोठ्याप्रमाणावर साचतो. त्यामुळे या लघु प्रकल्पांत खोलीकरण करण्यासाठी येथील गाळ काढण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. त्यासोबतच धरणाच्या भिंतींना तडे गेलेले बुजविण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. पाण्याची भूगर्भ पातळी जेवढी वाढेल तेवढे तालुक्यासाठी लाभदायक असल्याने या लघु प्रकल्पांवर जाणीवपूर्वक काम होणे आवश्यक आहे.
      तळोदा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची असणारी हातोडा पाणीपुरवठा योजनाही अजून पावेतो पूर्ण होऊ शकलेली नाही. शहराचा पाणीपुरवठा आजही भूगर्भातील पाण्यावरच अवलंबून आहे .तापीच्या पाण्याच्या अजूनही उपयोग तळोदा शहरासाठी होत नसल्याची परिस्थिती आहे . त्यामुळे संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून भूगर्भात जेवढे पाणी साठवले जाईल तेवढाच तालुक्याचा पाणीपुरवठा व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणाऱ्या या घटकांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

कालीचरण सुर्यवंशी 
9421887715

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी