कोरोना मुक्त झाल्यावर मित्रांनी केला पुष्पवर्षाव
कोरोना शी लढून तो परतला मित्रांनी केला फुलांचा वर्षाव......
प्रतिनिधी तळोदा
शहरातिल भोई गल्ली परिसरात राहणाऱ्या एक तरुण काल कोरोना मुक्त होऊन परतला परिसरातील मित्रांनी त्याच स्वागत करत फुलांचा वर्षाव केला या तरुणाची ची ओळख म्हणजे दिवसा शहरात व खेड्यापाड्यात वीज जोडणी, टीव्ही,डिश, च काम प्रामाणिक पणे करणे हा मूळ व्यवसाय घरात कुटुंब प्रमुख असल्याने कुटुंबाची जबाबदारी सर्वंस्व याचीच घरात म्हातारी आई, पत्नी व अनेकदा देवास प्रार्थना करून झालेलं नवसाच आठ महिन्याच् तानुल बाळ
घरात अठरा विश्व दारिद्र्य यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः तरुणाने काही वर्षेपूर्वी कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर घेतली खापर, कुकरमुंडा, अक्कलकुवा, देवमोगरा, शिरपूर सारंगखेडा यात्रा,
धडगाव बाजार, अश्वस्थामा यात्रा, असेल त्या ठिकाणी दुकान थाटून व्यवसाय करणे व या व्यतिरिक्त दररोज तळोद्यातील स्मारक चौकात दररोज संध्याकाळी सेंट्रल बॅंक समोर शेंगदाणे , फुटाणे, लावून व्यवसाय करणारा एक मेहनती तरुण म्हणून ओळख त्याला कोरोना झाल्याने मित्र परिवार व आप्त मध्ये आता कुटुंबातील सदस्य कर्ता पुरुषाला कोरोना ची लागण झाल्याने आता कस होईल?
असा प्रश्न पडला होता मात्र अखेरीज सर्व चर्चेस पूर्ण विराम देत चिवट व श्रमिक शरीर अंग काठी असल्याने त्याने कोरोना वर मात करत कालच परतला या अगोदर देखील काही रुग्ण या रोगावर मात करून यशस्वी घरी परतले आहेत तळोद्यात उशिरा का होईना करोना आजाराने शहरात शिरकाव केला असून हा कोरोना वर मात करून परतणाऱ्या काही लढवैया तळोदेकर मधील पैकी एक आहे.....
त्यांनी संपर्क साधून या बाबत अनुभव कथन केले
माझा अहवाल पॉझिटीव्ह आला त्यामुळं हा आजार कोरोना (कोविड१९) याची भीती मनात होती, त्यामुळं सुरवातीला भीती व चिंता वाढली मात्र मला माझा मित्र परिवार व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलासा दिला सकारत्मक विचार करायला हळूहळू सुरवात केली आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कडून दिलेल्या सूचना चे पालन करत मी या आजारावर मात केली आहे तरी मी सर्वांना आवाहन करेल की काळजी घ्या सुरक्षित अंतर ठेवत व मास्क नेहमी वापरावे हात परत परत स्वछ धुवावे
व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे ,
Comments
Post a Comment