तळोदा पालिका झूम ऐप सभा दोन विषय स्थगित तर इतर विषय मंजूर
स्वातंत्र दिनी ध्वजारोहण नवीन इमारतीच्या आवारात
सर्वसाधारण सभेत 54 पैकी 52 ठराव मंजूर
कालीचारण सूर्यवंशी || तळोदा
तळोदा नगर पालिकेची नव्या इमारतीत यावर्षी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आज दिली.पालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तळोदा नगरपालिकेची तहकूब करण्यात आलेली वादग्रस्त सर्वसाधारण सभा आज सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेली ही पालिकेची ही सर्वसाधारण सभा जिल्हातील पहिला प्रयोग ठरला आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या व्हर्चुअल सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते.सत्ताधारी भाजपासह विरोधी गटातील सर्व सदस्यांची या सभेला उपस्थिती होती.
अवघ्या 25 मिनिटांत उरकण्यात आलेल्या या सभेत तळोदा पालिकेच्या या सभेत बायो डीझल, खान्देशी गल्लीत समोरील मुतारी दोन वादग्रस्त विषय स्थगित ठेवण्यात आले आहेत, तर अन्य एक वादग्रस्त असणारा बियर बारला परवानगी देण्याचा ठरावाला मंजूरी देण्यात आली.यांच्या सर्व अजेंड्यावरील सर्व विषयांवर संक्षिप्त चर्चा होऊन ५४ विषय पैकी ५२ विषय मंजूर करण्यात आले.त्यात आदिवासी सांस्कृतिक भवन चा निधीस वाढीव मुदत वाढ,तळोदा पालिका हद्दीतील रिकाम्या जागेवर बगीचा व सुशोभीकरण करणे,नवीन बांधकाम करण्यात आलेल्या गाळ्यांचे अधिमूल्य सध्याचा बाजार भाव नुसार ठरविणे,विविध चौकात शिल्प बसविणे, अश्या विकास काम सोबतच स्थानिक आमदार निधीतून काही विकास कामे व गटारी, काँक्रीटकरणं इत्यादी काम मंजूर करण्यात आले आहेत
बायोगॅस विषय स्थगित - या सर्व विषयापैकी ज्या वादग्रस्त विषयांमुळे सभा मागील सभा तहकूब करावी लागली त्यांपैकी एक असणारा बायोडीझल पंपाला मंजुरी देणे, या विषयावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळं हा विषय स्थगित ठेवण्यात आला आहे.हा विषय तळोदा पालिकेतील कोंग्रेस चा नगरसेवकांशी संबंधित असल्याने भाजपा मधील एक गटाकडुन या ठरावास विरोध दर्शविण्यासाठी आला असल्याचे सांगण्यात येते.
या व्हर्चुअल सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, बेबीबाई पाडवी, भास्कर मराठे, शोभा बाई भोई, अमोन्नोद्दीन शेख, अंबिका शेंडे, सुरेश पाडवी, सविता पाडवी, योगेश पाडवी, सुनयना उदासी, स्वीकृत नगरसेवक हेमलाल मगरे,काँग्रेसचे गटनेते संजय माळी,नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, कल्पना पाडवी, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी, यांनी उपस्थित लावली व चर्चेत सहभाग घेतला.सभेचे कामकाज संगणक तज्ञ सचिन पाटील व मुख्यधिकारी सपना वसावा यांनी काम पाहिले.
पालिकेच्या सभागृहात याहा मोगी मातेचे नावं
सभे नंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तळोदा पालिका नवीन जागेत स्थलांतर बाबतीत काम वेगात सुरू आहेत.त्या दृष्टीने येणाऱ्या १५ आगस्ट ला स्वतंत्र दिनी ध्वजारोहण नवीन इमारत आवारात होणार आहे असल्याची माहिती त्यांनी दिली. उदघाटन साठी वरिष्ठ स्तरावर बोलणी असून पावसाचा वत्यय ज आल्यास स्थलांतराचे काम लवकरच संपवून नव्या इमारतीतून पालिकेचा कामकाजाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नविन पालिकेच्या इमारतीच्या मुख्य सभागृहाला देवी याहा मोगी मातेचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती देखिल त्यांनी दिली आहे.नावाचा फॉरमॅट ठरल्यावर सभागृहाचे नामकरण करण्यात येणार आहे.
मुख्यधिकारी यांचा दालनात होता प्रोजेकटर -
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्यासाठी पालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती.मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रोजेक्टर,कॅमेरा,संगणक,साउंड सिस्टीम असा पूर्ण सेट उभा करण्यात आला होता.मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बसूनच नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा यांनी सभा चालविली.या सभेसाठी इलेक्ट्रॉनिक सामग्री पालिकेकडून भाड्याने आणली असून जवळपास 10 हजार रुपये खर्च करावे लागले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे मुख्याधिकारी सपना वसावा यांनी सांगितले.
प्रथमच अशी सभा म्हणून गोंधळ -
अश्या सभा कोरोना मूळ आता सर्वत्र होत असल्यातरी अशी सभा पालिकेची घेण्याची सराव पालिका प्रशासन व नगरसेवक दोघांना नसल्याने अनेक नगरसेवक एकाच वेळी संवाद साधत होते त्यामुळे गोंधळ उडत होता.व्हर्च्युअल सभेत सहभागी होणे नगरसेवकांना सोप जावे व अडचणी निर्माण होऊ नये यासाठी काल देखिल पालिकेच्या वतीने नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले होते व प्रत्यक्षात सभा सुरू होण्यापूर्वी देखिल सभेचा डेमो घेण्यात आला होता.तरी प्रत्यक्षात सभा सुरू झाल्यावर त्याचा काही एक फायदा झाला नसल्याचे दिसून आले.एका मागे एक अस शिस्तबद्ध बोलणं झालं असत तर सभा अधिक सुरळीत पार पडली असती.
तळोदा पालिकेची सर्व साधारण सभा याच विषयांवर साधारण दिड महिन्यांपूर्वी सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र त्यातील काही वादग्रस्त विषयांमूळ सभे दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळं सभा रद्द करण्यात आली होती,
Comments
Post a Comment