तळोदा
सध्याच्या परिस्थितीत या जागतिक महामारीतून सावरण्यासाठी प्रत्येक व्यक्ती,  संघटना कार्यकर्ते पक्ष जो तो शक्य त्या परिस्थितीत सगळ्याच गोष्टी बाजूला सारून कार्य करतो आहे. त्याच अर्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या हम होंगे कामयाब या अभियानांतर्गत आज नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरात अर्सनिक अल्बम ३० या गोळ्यांचे डी बी हट्टी येथे वाटप सुरू होते यावेळी एक अनोखा अनुभव अभाविपच्या कार्यकर्त्यांना तळोदा शहरात आला खरंतर अभाविप म्हणजे राष्ट्रवादी विचार आणि विद्यार्थीहित जोपासणारी संघटना परंतु या जागतिक महामारी च्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर अर्सनिक अल्बम ३० किंवा इतर सेवा कार्य करण्यात विद्यार्थी परिषदेचा मोठा वाटा आहे. यावेळी पक्षभेद संघटना आपापसातील मतभेद विसरून शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.गोविंदा पाडवी, धनराज पाडवी, कांतीलाल पाडवी तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री प्रेम माळी, शहर आंदोलन प्रमुख भावेश कोळपे या सगळ्यांनी मिळून या सेवा वस्तीत अर्सनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केलं आणि समाजापुढे या करुणा काळात या जागतिक महामंदीच्या काळात एक उदाहरण घातलं खरं अशा कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्यास ग्रामीण भागाला उंचावर येण्यासाठी किंवा पुन्हा नव्याने आपले ध्येय युवकांना साध्य करण्यासाठी निश्चितच वेळ लागणार नाही असा शाश्वत विश्वास आम्हा सगळ्यांना यामाध्यमातून वाटतो.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी