तळोदा शहर प्रवेशद्वाराचे श्री संत गुलाम महाराज नामकरण करत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण
प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संत गुलाम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन व फीत कापून प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजप तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र चंद्रसेन पाडवी, प्रेम पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, तळव्याचे माजी सरपंच नारायण ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश केदार, माजी जि प सदस्य सुनील चव्हाण, शहादा तालुका भाजपाचे अध्यक्ष डॉ किशोर चव्हाण,आमदार राजेश पाडवीचे स्वीय सहाय्यक प्रा विलास डामरे, विरसिंग पाडवी, पालिकेचे आरोग्य निरक्षक अश्विन परदेशी आदींसह पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका व आप धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Comments
Post a Comment