तलोद्यात वाहन सह लाकूड जप्त एकूण 15 लाखाचा माल जप्त
तलोद्यात 5 लाख किमतीचे खैर लाकूड जप्त
वाहन सह १५ लाखांचा माल जप्त
: अमोनी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनउप तपासणी नाक्यावर संशयीयरित्या लाकूडची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून वन विभागाने पाच लाखाच्या खैर जातीचे पाच लाखाचे लाकूड व वाहकानासह अंदाजे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती माहिती अशी की, खैर जातीचे लाकूड भरलेला ट्रक क्रमांक एम एच 18 ए ए 0115 हे तळोदा येथील वन उपज तपासणी येथून संशयीयरित्या मार्गक्रमण करतांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.या वाहनाची तपासणी केली असता पांढरकवळा वनविभागाकडील उमरी वनक्षेत्रतून खैर जातीच्या लाकडाच्या मालाची वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले.या लाकुडची वाहतूक करण्यासाठी मौजे कोरेगाव ते अक्कलकुवा 14 जुलै 2020 रोजी दिलेला परवाना 1640770 त्यांच्याकडे आढळू आले.परंतु तो परवाना व वाहतूक केले जाणारे लाकूड हे संशयास्पद असल्याचे वॅन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आले.त्याची अधिक चौकशी करून वाहन चालक व मालक नसीब अली खा (रा रिसोड ता वाशिम) याच्याविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 50 नुसार वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी वाहन चालक व मालक यांचे बंधपत्र घेऊन पुढील तपास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
लाकडा सह ट्रक कळवा येथील वनविभागाच्या आगारामध्ये जमा करण्यात आली आहे
Comments
Post a Comment