प्रा. डॉ. एस. आर. मगरे यांची अ. शि. मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा येथे प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा. डॉ. मगरे एस. आर. यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून सन 1991 साली गोगलगाय वर संशोधन करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. सन 1992 साली तळोदा महाविद्यालयात व्याख्याता पदावर नियुक्ती झाली नंतर त्यांनी प्रपाठक, संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक अशी शैक्षणिक प्रगती करतांना आज प्रभारी प्राचार्य पदापर्यंत अविरत सेवा दिली आहे. या 29 वर्षांच्या अखंड सेवेत त्यांनी एकूण 94 संशोधन पत्रिका लेखन केले आहे. यु. जी.सी दिल्लीचे तीन लघुसशोधन प्रकल्प व एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. सातपुड्यातील सुमारे 200 विविध सजीवाचा अभ्यास केला असून संशोधन व अभ्यासासाठी थायलँड, मलेशिया व नेपाळ देशांना भेट दिली आहे.
Comments
Post a Comment