सलून व्यवसायिकांनी नियम पाळा,,,, पालिका प्रशासन कडून सूचना
तळोदा: सलून पार्लरमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्यांने व शासनाने ठरवून दिलेल्या आदेशानव्ये उपाययोजना होत नसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पालिकेचा निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने येथील पालिका प्रशासनाने काल गुरुवार रोजी सलून व्यवसायीकांची बैठक घेऊन कडक सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्ह्यातील सलून दुकाने, ब्युटी पार्लर आणि बार्बर शॉप सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशान्वये परवानगी देण्यात आली आहे. मात्र या प्रकारच्या दुकानात केवळ केस कापणे, हेअर डाईंग, वॅक्सींग आणि थ्रेडींग इत्यादी सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी दाढी करणे, मसाज करणे आदी त्वचेसंबंधीत सेवांना परवानगी नसताना बिनधास्तपणे त्या सुरू आहेत. सोशल डिस्टन्सचा नियमांना तिलांजली देऊन बऱ्याच ठिकाणी गर्दी पहावयास मिळत असल्याने कोरोनाचा पादुर्भाव वाढीस कारणीभूत ठरू शकते. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्स राखत केस कर्तन व्यवसायीकांची बैठक घेऊन कडक सूचना दिल्या आहेत.
दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी आणि कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधानांच्या वापरासह ग्लोव्हज, ॲप्रोन आणि मास्कचा वापर करावा, ग्राहकांना सेवा दिल्यानंतर दुकानातील खुर्च्या निर्जंतुकीकरण कराव्यात, दुकानात ग्राहकांवर ब्लेडचा वापर न करता एकाचवेळी वापरात येईल असे रेझर ब्लेड वापरावेत. यासोबतच एकदाच उपयोगात येणारे (डिस्पोजेबल) टॉवेल किंवा नॅपकीनचा उपयोग ग्राहकांसाठी करणे आणि सेवा देण्यापूर्वी व सेवा दिल्यानंतर साधनांचे निर्जंतुकीकरण बंधनकारक असून एका वेळेस दुकानात दोन किंवा तीन पेक्षा अधिक ग्राहकाना परवानगी देऊ नये अश्या सूचना प्रशासकीय अधिकारी राजेश पाडवी यांनी दिल्या. मात्र या नियमांचे काटेकोरपणे पालन कुठेही होताना दिसत नसल्यांने त्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल डिस्टन्स व दुकाने निर्जंतुकिकरनावर भर द्या व शासनाने आखून दिलेल्या नियमांचे कटेकोरपणे पालन करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी, वसुली निरीक्षक राजेंद्र माळी यांच्यासह सलून व्यावसायिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment